थुंकीसाठी आता रेल्वे प्रवाशांना बटवा

    दिनांक :26-Aug-2020
|
- नागपूर स्थानकावर प्रथमच प्रयोग
- स्वच्छतेसाठी आणखी एक पाऊल

नागपूर,
भारतीय रेल्वे नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उरतवित आहे. प्रवासी केंद्रqबदू मानून नव्या प्रयोगासोबतच उपक्रम राबविले जात आहेत. यातील बरेच उपक्रम तर प्रारंभी नागपूर रेल्वे स्थानकावर राबविल्यानंतर देशभरात लागू करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या संकल्पनांचा आणि नवनवीन उपक्रमांचा देशभरातील प्रवाशांना आणि प्रशासनाला चांगलाच फायदा झाला. शिवाय स्वच्छता ठेवण्यातही मदत झाली.

railway central_1 &n 
याच श्रृंखलेत मध्य रेल्वे नागपूर विभागाने आता थुंकीसाठी एक बटवा अर्थात पाऊच तयार केले आहे. प्रवासादरम्यान इतर कुठेही घाण न करता बटव्यामध्येच थुंकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे थुंकी जाताच बटवा कोरडा होऊन जाईल. या बटव्याचा प्रवासादरम्यान अनेकदा वापर करता येऊ शकतो. भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच थुंकीसाठी बटव्याचा वापर करण्यात येणार असल्याने स्वच्छता राखण्यासाठी त्याची मदत होणार आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पृष्ठभूमीवर हा बटवा वरदान ठरणार आहे.
 
प्रवासादरम्यान प्रवाशांना तासन्तास एकाच बर्थवर बसून रहावे लागते. ज्येष्ठ नागरिक आणि आजारी असलेल्यांना थुंकीसाठी अडचण जाते. प्रवाशांच्या गर्दीतून पुन्हा पुन्हा उठून वॉशरुमपर्यंत जाणे शक्य होत नाही. अशा वेळी प्रवासी हळूच कोपèयात थुंकतात qकवा खिडकी उघडून थुंकी बाहेर टाकतात. वाèयाच्या वेगानी ही थुंकी मागच्या खिडकीतील प्रवाशांच्या अंगावर पडते. त्यामुळे बरेचदा वादही होतात. शिवाय संक्रमणाचीही भीती असते.
 
आता मात्र, खिडकीतून बाहेर थुंकण्याची गरज नाही. गर्दीतून मार्ग काढून वॉशरुमपर्यंतही जाण्याची गरज नाही. रेल्वेने थुंकीसाठी सहज सुविधा सुरू केली आहे. याकरीता प्रवाशांना केवळ १० रुपये खर्च करावे लागतील. अशा प्रकारचा बटवा नागपूर रेल्वे स्थानकावरच मिळेल. प्रवासी या बटव्याचा थुंकीसाठी अनेकदा वापर करू शकतात. थुंकी जाताच बटवा कोरडा होईल. या बटव्याचा रुमाल म्हणूनही उपयोग करता येऊ शकतो. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर थुंकी आणि qशकणाèयाकडे संशयाने बघितले जाते. आता या बटव्यामुळे स्वच्छतेसह इतर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
 
आगळा वेगळा परंतु यशस्वी उपक्रम राबविण्यात नागपूर रेल्वे स्थानक अव्वल ठरत असल्याने भारतीय रेल्वेचे लक्ष याकडे केंद्रित झाले आहे. या मशीनच्या लोकार्पणाला मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थुल, वाणिज्य निरीक्षक ताराप्रसाद आचार्य उपस्थित होते.

प्लॅस्टिकने सामान गुंडाळा अन् निश्चिंत व्हा
नागपूर रेल्वे स्थानकावर कोरोनापासून बचाव करण्यासाठी निजंर्तुकीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुसरीकडे प्रवाशांचे सामान प्लॅस्टिकने गुंडाळण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर एक केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेशकुमार यांच्या मार्गदर्शनात भारवाहक संघटनेचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांच्या हस्ते करण्यात आले.
 
या केंद्रात प्रवाशांना आपले सामान प्लॅस्टिकने गुंडाळता येईल. १० ते १०० रुपयात ही सुविधा प्रवाशांना मिळेल. प्रवाशांच्या सामानाला विशिष्ट पद्धतीने रॅqपग केले जाईल. अर्थात गिफ्टप्रमाणे व्यवस्थित बांधले जाईल. आधी चोरीची भीती होती आता चोरीसह संक्रमणाची भीती आहे. या पद्धतीमुळे प्रवाशांना दिलासा तर मिळेल शिवाय रेल्वेचा महसूल वाढेल.