अधिकाऱ्यांसह ४३ पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित

    दिनांक :27-Aug-2020
|
- ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात शिरकाव
- बाहेरील व्यक्तींना २ सप्टेंबरपर्यंत न येण्याचे आवाहन
नागपूर,
तपासणीचे प्रमाण वाढल्याने कोरोना बाधितांचीही संख्या वाढत आहे. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव होत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरत आहे. फ्रंट लाईनवर काम करणारे ग्रामीण पोलिस कर्मचारीही कोरोना बाधित झाले. सध्या तीन अधिकारी आणि ४० कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोनाबाधित आहे. त्या पृष्ठभूमीवर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात आणि अंतर्गत येणाऱ्या सर्व ठाण्यात खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच बाहेरील व्यक्तींनी त्यांच्या कामासाठी किमान २ सप्टेंबरपर्यंत कार्यालयात येऊ नये, असे आवाहन ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे. या कालावधीत नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी सादर करण्यासाठी हेल्पलाईन किंवा १०० या क्रमांकावर संपर्क साधावा.
 
mh police_1  H  
 
पोलिस अधीक्षक कार्यालय नागपूर ग्रामीण येथे कोरोना संसर्ग वाढत आहे. यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सतत लोकांच्या संपर्कात आल्यामुळे पोलिस कर्मचारी मोठया संख्येने बाधित झाले आहेत. कार्यालयात आता जवळ जवळ ७० कर्मचारी काम करीत आहेत. त्यामुळे ईतर लोकांतही कोरोनाचे संक्रमण पसरण्याची शक्यता आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून कोरोना बाधित कर्मचाऱ्यांना घरीच विलगिकरण करण्यात आले आहे. तर काहींना आमदार निवास येथे ठेवण्यात आले आहे. तर काही खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.