गडचिरोलीत आज 56 नव्या बाधितांची नोंद

    दिनांक :27-Aug-2020
|
- 2 जण कोरोनामुक्त
गडचिरोली,
जिल्ह्यातील चामोर्शी येथे प्रतिबंधात्मक क्षेत्रातील काल सायंकाळी 16 आज 27 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच चामोर्शी येथील 1 लॅब कामगारही बाधित झाल्याने तालुक्यातील 44 कोरोना बाधितांसह जिल्हयात 56 बाधितांची नोंद झाली.
 
corona_1  H x W
 
उर्वरीत तालुक्यांमध्ये यात अहेरीचे विलगीकरणातील 4, गडचिरोली 5 यात ब्रहमपुरी येथून आलेला 1, सरोदे वार्ड मधील 2, बुलढाणा प्रवासी 1 व सामान्य रूग्णालयातील रूग्ण यांचा समावेश आहे, वडसा तालुक्यातील 2 एसआरपीएफ व कुरखेडा मधील 1 दुकान दार असे आज 56 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज आष्टी व आरमोरी येथील एक एक रूग्ण कोरोनामुक्त झाला. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 152 झाली. कोरोनामुक्त रूग्णांची संख्या 839 तर एकुण बाधित संख्या 992 झाली.