अभावि बुलढाणा जिल्हातर्फे धुळे येथे झालेल्या अमानुष घटनेचा निषेध

    दिनांक :27-Aug-2020
|
बुलडाणा,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेऊन अभाविपचे कार्यकर्ते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा करायला गेले. त्यांनी भेट नाकारली विद्यार्थ्यांनी त्यांचा ताफा अडविला. संतप्त विद्यार्थ्यावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. या घटनेचा तिव्र निषेध अभावीप बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 27 ऑगस्ट रोजी आज दुपारी करण्यात आला आहे.
 
abv_1  H x W: 0 
 
विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा चालु वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात 30 टक्के कपात करा नि चुकीच्या लागलेल्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करा. इतक्या साध्या मागण्या असूनही अब्दुल सत्तार यांनी भेट नाकारली. भेट नाकारल्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सत्तारांचा ताफा अडवला ,यावेळी पोलीस प्रशासनाने अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांना एखाद्या आतंकवाद्याप्रमाणे मारहाण केलीय. घटनेचा व गेंड्याच्या कातडीच्या निगरगट्ट सरकारचा आज अभाविप बुलडाणा जिल्हा तर्फे जिल्हा अधिकारी यांना निवेदन देवून या घटनेचा तीव्र निषेध नोंदन्यात आला यावेळी अभाविपचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
याप्रसंगी अभाविप जिल्हा संघटन मंत्री अमोल पवार, संयोजक कृष्णा कुसुंबे, संयोजक विष्णू काळे, वैभव लाड, ऋषीकेश कुळकर्णी, चैतन्य जोशी, मयुर हरिदास, अंकुश भालेराव , मयूर काळे, आशुतोष पालवे, वासुदेव धुंदळे, प्रसाद धरगावणे, गोपाल धरगावणे, गोपाल पाटील, बजरंग दलाचे बाला राऊत , राहुल जाधव उपस्थित होते.