बिडेन यांचा विजय अमेरिकेसाठी विध्वंसक ठरेल

    दिनांक :27-Aug-2020
|
- रिपब्लिकन नेत्यांची टीका
वॉशिंग्टन,
राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन आणि उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा निवडणुकीत विजय झाल्यास, तो अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी विध्वंसक ठरेल. तसेच, ते देशाला समाजवादी विचारप्रणालीकडे झुकवतील, अशी टीका रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.
 
biden_1  H x W: 
 
आरएनसी अर्थात्‌ रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अनेक वरिष्ठ नेत्यांनी जो बिडेन आणि हॅरिस यांच्यावर जोरदार टीका केली. तीन नोव्हेंबरच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यास अमेरिकेचे भवितव्य धोक्यात येईल, असेही रिपब्लिकन नेत्यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांतील माजी राजदूत निकी हॅले म्हणाल्या की, अमेरिकेसाठी त्यांचा दृष्टिकोन समाजवादी आहे आणि समाजवाद सगळीकडे अपयशी ठरल्याचे आपल्याला दिसून येत आहे. जो बिडेन आणि समाजवादी डावे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी नुकसानकारक ठरतील. डोनाल्ड ट्रम्प मात्र नव्या युगाचे नेतृत्व करत आहेत.