झिमेला गावाला जोडणारा पूल गेला वाहून

    दिनांक :27-Aug-2020
|
- ये-जा करण्यास नागरिकांना होतोय कमालीचा त्रास
अहेरी,
अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत तिमरम अंतर्गत येणाऱ्या झिमेला गावाला जोडणारा एकमेव मुख्य रस्ता आहे. झिमेला नाल्यावरील पुलाचे बांधकाम होऊन 35-40 वर्षांचा काळ लोटला आहे. हा पुल उंचीने ठेंगना असून पूर्णपणे जीर्णावस्थेत आहे. गेल्या 15 दिवस सततच्या मुसळधार पावसामुळे या नाल्यावरील पूल पूर्णपणे वाहून गेला आहे.
 

zhimela_1  H x  
 
झिमेलावासीयांना काही कामानिमित्त तालुका किंवा अन्य ठिकाणी ये-जा करण्यास अडचणीचे ठरत असून त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य मार्गावरील पूल वाहून गेल्यामुळे आजारी रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. झिमेला गावातील नागरिक, विध्यार्थी, शेतकरी, आरोग्य कर्मचारी, रुग्ण यांना होणाऱ्या अडचणींचा विचार करून शासनाने या नाल्यावर नवीन पूल बांधकाम करून पूलाची ऊंची वाढवावी. तात्काळ संबंधित विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन पूल दुरुस्ती करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष गणपूरवार, सुरेश पोरतेट, तिरुपती सडमेक, विनोद तोर्रेम, भगवान सिडाम, धर्मराज पोरतेट, अशोक आत्राम, बापु सिडाम, शंकर गावडे, दिलीप आत्राम यांनी केली आहे.