वृद्धांमध्येही तयार होणार कोरोना रोगप्रतिकारकशक्ती

    दिनांक :27-Aug-2020
|
- मॉडर्नाकडून अखेरच्या टप्प्यातील परीक्षण
वॉशिंग्टन,
कोरोना लसीसंबंधी वृद्धांवर केलेल्या परीक्षणाचे निकाल उत्साहवर्धक आढळून आल्याचे औषधी निर्मिती क्षेत्रातील उत्पादक संस्था मॉडर्नाने म्हटले आहे. याशिवाय लसीच्या सुरुवातीच्या परीक्षणाबाबतची नवी माहितीही एका निवदेनाद्वारे जारी केली आहे.
 
old age_1  H x  
 
सर्वसामान्यपणे लसीचा परिणाम युवकांच्या तुलनेत वृद्धांवर फार कमी होत असतो. मात्र मॉडर्नाने केलेल्या कोरोना चाचणीसंबंधी निकालात 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांतही रोगप्रतिकारकशक्तीचे प्रमाण तरुणांच्या तुलनेत अधिक असल्याचे आढळून आले आहे. अमेरिकेतील आरोग्यसंबंधी एका संस्थेसमक्ष ही आकडेवारी ठेवण्यात आली. दरम्यान, यासंबंधीची चाचणी 20 लोकांवर करण्यात आली होती. तसेच, लसीचे परीक्षण अखेरच्या टप्प्यात पोहोचले आहे. विशेष म्हणजे कोरोनातून बर्‍या झालेल्या लोकांपेक्षाही या वृद्धांमध्ये रोगप्रतिकारकशक्तीचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. ही लस दिल्यानंतर थंडी, ताप आणि थकव्यासारखे दुष्परिणाम दिसून आले. मात्र, यात विशेष गंभीर नसल्याचे मॉडर्नाने स्पष्ट केले आहे.
 
 
यापूर्वी मॉडर्नाने संबंधित लस तरुणांमध्ये विषाणूविरोधात रोगप्रतिकारकशक्ती तयार करत असल्याचे म्हटले होते. यानंतर वृद्धांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याने त्यांच्यासाठीही परिणामकारक ठरणारी लस तयार करण्यावर लक्ष कें द्रित केले होते.