अमरावतीत कोरोनाचा कहर सुरूच; 180 बाधितांची भर

    दिनांक :27-Aug-2020
|
- 6 रुग्णांचा मृत्यू,
- 124 रुग्ण कोरोनामुक्त
तभा वृत्तसेवा
अमरावती,
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अंतीम आकडेवारीनुसार एकाच दिवसात 180 बाधित झाले तर 124 मुक्त झाले. धक्कादायक म्हणजे 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
 

corona_1  H x W
 
जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 980 कोरोनाग्रस्त झाले आहे. त्यापैकी 1234 रुग्ण क्रियाशील असून त्यातील 19 रुग्णांना नागपूरात हलविण्यात आले तर 369 गृह विलगिकरणात आहे. आतापर्यंत 118 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 3628 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीपर्यंत अमरावती शहर व जिल्ह्यातल्या विविध भागातील 180 रुग्णांनचे अहवाल सकारात्मक आले होते. या नवीन बधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे थ्रोट स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संक्रमीत होणाऱ्यांची संख्या जरी वाढत असली तरी रुग्ण कोरोना मुक्त होण्याचे प्रमाणही उत्तम आहे.
 
 
सहा रुग्णांचा मृत्यू
जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार घेणार्‍या सहा रुग्णांचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात अमरावतीच्या गुलिस्तानगर येथील 65 वर्षीय महिलेचा, बेलपुरा येथील 72, दर्यापूर येथील 57, धारणी येथील 62, यावली शाहिद येथील 72, नांदगाव पेठ येथील 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या सहा मृत्यूमुळे एकूण मृत्यू संख्या 118 झाली आहे.
 
 
बाधितांची संख्या वाढणार
कोरोनाचे समूह संक्रमण झाल्यामुळे बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. ती आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. जवळपास अडीच हजार कोरोना अहवाल बुधवार रात्री पर्यंत प्रलंबित होते.