कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून 50 नवीन ग्रहांचा शोध

    दिनांक :27-Aug-2020
|
वॉशिंग्टन,
अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या (नासा) उपग्रहांकडून येणार्‍या माहितीचे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे विश्लेषण करून सुमारे 50 संभाव्य नवीन ग्रहांचा शोध लावल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. यातील काही ग्रह ‘नेपच्युन’ ग्रहाइतके मोठे असून, काही पृथ्वीपेक्षा लहान आहेत.
 
planets _1  H x 
 
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रथमच उपग्रह शोधण्यासाठी करण्यात आला आहे. वॉर्विक विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ व संगणक संशोधकांनी हा शोध लावला आहे. केप्लर या अमेरिकी यानाकडून सातत्याने माहिती पाठविली जाते. या माहितीचे विश्लेषण व माहितीतील अडचणींचे निवारण करण्याची प्रक्रिया केली जाते. येणार्‍या माहितीतून खरा ग्रह कसा ओळखायचा व कोणता खोटा असू शकतो, यासाठीचे आडाखे संगणकाला पुरविण्यात आले. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आलेल्या माहितीचे पृथक्करण करून सुमारे 50 ग्रह असावेत, असा कयास या संशोधकांनी बांधला आहे. यातील काही ग्रह लहान व काही मोठे आहेत. काहींची परिवलन कक्षा 200 दिवस, तर काहींची एक दिवस आहे.
 
 
या प्रयोगाबाबत वॉर्विक विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डेव्हिड आर्मस्ट्रॉंग म्हणाले, ‘मशीन लर्निंग’द्वारे ग्रह निश्चितीचा प्रयोग प्रथमच करण्यात आला आहे. आता सांख्यिकीच्या मदतीने खरा ग्रह अचूकपणे ओळखता येणार आहे. यात चुकीचे प्रमाण केवळ एक टक्का असेल.