मादक पदार्थ नियंत्रण विभागाचे गोव्यात छापे

    दिनांक :27-Aug-2020
|
- लक्ष्यावर आहेत अंमली पदार्थ तस्कर
मुंबई,
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना नवीन माहिती समोर येत आहे. बुधवारीच सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती व अन्य काही जणांविरुद्ध अंमली पदार्थाच्या वापरप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मादक पदार्थ तस्कर गौरव आर्य हा अभिनेत्यांना अंमली पदार्थ पुरवत होता, अशी माहिती पुढे आली. त्यामुळेच आता मादक पदार्थ नियंत्रण विभागाने गोव्यात आपले लक्ष केंद्रित केले असून मादक पदार्थांचा पुरवठा करणार्‍या तस्कराचा शोध घेतला जात आहे. लवकरच गौरवला ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.
 
drugs_1  H x W: 
 
सुशांत व रिया चक्रवर्ती यांना मादक पदार्थांचा पुरवठा केला जात होता, याचे पुरावे ईडीला मिळाल्याचा दावा मादक पदार्थ नियंत्रण विभागाचे संचालक राकेश अस्थाना यांनी केला होता. त्यानंतर रियाविरुद्ध मादक पदार्थ प्रतिबंध कायद्यातील कलम 20, 22, 27 व 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
ईडीने पाठविलेल्या पत्रात मादक पदार्थसंदर्भात पुरावे देण्यात आल्याची माहितीही अस्थाना यांनी दिली. त्यामुळे आता मादक पदार्थ नियंत्रण विभागही त्या दृष्टीने तपास करणार आहे.
 
 
यासंदर्भातले रियाचे काही व्हॉट्‌सअॅप संवाद प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली होती. आता एनसीबीच्या संचालकांनीच पुरावे मिळाल्याचा दावा केल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.