शहरात जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

    दिनांक :27-Aug-2020
|
- शहरात कोरोना रुग्णांची संख्या 50
चामोर्शी,
कोरोना संसर्ग नसलेल्या शहरात दोन तीन दिवसापासून कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी व त्यातच आज सकाळपासून पावसानेही प्रतिसात दिला. त्यामुळे गावात रस्त्यांनी शुकशुकाट होता.
 

janta curfew_1   
 
शहरात प्रभाग 9 मध्ये 22 आगस्टला तीन कोरोनाबाधित रुग्ण निघाल्यानंतर तेथील 24 नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यात 17 व्यक्ती 26 आगस्ट रोजी कोरोना पाझिटीव्ह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाल्याने प्रशासनाणे सदर प्रभाग प्रतिबंधिक क्षेत्र घोषित करून त्या प्रभागातील सुभाष सरपे यांच्या घरापासून मनोहर कोटांगले ते सुरेश गदे व श्रावण वासेेकर यांच्या घरापर्यंत चा भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले. दरम्यान काल आपत्ती व्यवस्थपन, आरोग्य विभाग व स्थनिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या क्षेत्राची पहाणी केली. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने 27 आगस्ट रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज आरोग्य सेवा, शासकीय कार्यालय, बँक वगळता सर्व व्यापार पेठ व भाजीपाला दुकाने बंद होती.  त्याला नागरिकांनीही उत्तम प्रतिसात दिला.
 
दरम्यानच्या कालावधीत दोन दिवसापूर्वी येथील प स मधील दोन कर्मचारी कोरोनाबाधित निघाल्याने पंचायत समिती मधील सर्व अधीकारी व कर्मचाऱ्याच्या चाचण्या करण्यात आल्या त्यात सर्व कर्मचारी निगेटिव्ह आले असून दोन दिवसापासून पस चे अंतर्गत कामकाज सुरु होते तर 27 आगस्ट पासून कामकाज पूर्ववत सुरु राहणार असल्याचे पंचायत समितीचे सवर्ण विकास अधिकारी नितेश माने यांनी दिली. तर आज प्रभाग क्र 9 मध्ये नारपंचयात प्रशासनाकडून सकाळपासून च प्रतिबंधीत प्रभाग ,शासकीय कार्यालय, न्यायालय आदी ठिकाणी फवारणी करण्यात आली. आज आरोग्य विभागाचे पथक प्रतीबंधीत प्रभागात प्रत्येक नागरीकचय्या चाचण्या करीत असून त्या मध्ये आज 27 आगस्त ला परत 27 कोरोना पाझिटिव आढल्याने चामोर्शी शहराची रुग्ण संख्या 50 झाली आहे.पोलीस प्रशासनाकडून सदर प्रभाग ब्यारिकेट लाऊन सिल करण्यात आला. कोरोना रुग्णाची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी घरातच रहावे ,बाहेर पडू नये असे आवाहन तहसीलदार गंगथडे, नायब तहसीदार तनगुलवार, न प मुख्याधिकारी सतीश चौधरी, गटविकास अधिकारी नितेश माने यांनी केले तर सर्व जनतेनी सावधगिरी बाळगण्याचे आवहान पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी केले आहे.