समाजमाध्यमांवरील टीकेमुळे कलकार हैराण

    दिनांक :27-Aug-2020
|
मुंबई,
सध्या समाजमाध्यमांमध्ये सातत्याने होणार्‍या टीकेमुळे बॉलीवूड कलाकार हैराण झाले आहेत. परिणामी अनेकांनी यापासून दूर जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
 
alia-pooja_1  H 
 
आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली सातत्याने नवनव्या वादात अडकतो आहे. आधी अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येच्या प्रकरणात त्याचे नाव घेतले जात होते. आता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातही त्याचे नाव येऊ लागले आहे. परिणामी, त्याला या दोन महिन्यात अनेकदा टीकेचा सामना करावा लागला आहे. सतत नकारात्मक विधाने, लोकांची (ट्रोलर्स) टीका यांना कंटाळून आपल्या सगळ्या इन्स्टा पोस्ट त्याने काढून टाकल्या आहेत. केवळ आपली 29 व्या वाढदिवसाची पोस्ट त्याने ठेवली आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री पूजा भट्टनेही इन्स्टाग्रमाला रामराम ठोकला आहे. सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यात महेश भट्ट यांचे नाव आले. तसेच आलिया, पूजा यांच्यावरही सुशांतप्रेमी बरसले. टीका होत होती तोवर ठीक होते. पण आता पूजाला इन्स्टाग्रामवरून जिवे मारण्याच्या, बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. हे लक्षात घेऊन पूजानेही इन्स्टा खात्याचे स्टेटस खाजगी केले आहे. आता इन्स्टावर जर पूजा भट्ट असे शोधले तर तिचे खाते दिसत नाही. तिच्या फ्रेंडलिस्ट मध्ये असलेल्यांनाच ते अकाऊंट दिसेल. सततच्या ट्रोलर्सच्या टोमण्यांना कंटाळून पूजाने हे पाऊल उचललं आहे.
 
 
सोनाक्षीची नवी मोहीम - अब बस
इन्स्टासह सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कलाकारांना छळवणुकीला सामोरं जावं लागतं. इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक यापैकी असा एकही प्लॅटफॉर्म नाही जिथे कलाकारांना टीका सहन करावी लागत नाही. टीका होत होती तोवर ठिक आहे. पण आता कलाकारांचा मानसिक छळ करण्याकडे ट्रोलर्सचा कल वाढतो आहे. हे लक्षात घेऊन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अब बस ही कॅम्पेन सुरू केली आहे. असा कोणी जर कुणाचा छळ करत असेल तर मुंबई पोलीस, सायबर पोलीस यांच्या सहकार्याने ही कॅन्पेन सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत एका ट्रोलकर्‍याला पकडण्यातही आलं आहे. यापुढे बोलायचं त जपून बोला असा दम तिने आपल्या एका इन्स्टा क्लिपद्वारे ट्रोलकर्‍यांना भरला आहे.