महाराष्ट्रातील देवस्थाने तात्काळ खुली करा

    दिनांक :27-Aug-2020
|
- आ. ॲड. आकाश फुंडकर यांची मागणी
खामगाव, 
कोरोनाच्या काळात जीवन पूर्ववत सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मास, मदिरा सर्व काही खुले केले आहे. परंतु, संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात 'हरी'ला मात्र बंदिस्त ठेवले आहे. त्यामुळे सर्वे धार्मिक स्थळ व मंदिरे तात्काळ खुली करण्यात यावी, अशी मागणी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर तथा जिल्हाध्यक्ष भाजपा यांनी केले आहे. या मागणीसाठी दिनांक 29 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता राज्यभरात सर्वत्र देवस्थाने, मंदिर, धार्मिक स्थळांसमोर 'घंटानाद' आंदोलन करण्यात येणार आहे. या घंटानाद आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार ॲड. आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष भाजपा यांनी केले आहे.
  
akash fundkar_1 &nbs
 
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल, मास, मदिरा सर्वकाही चालू केले आहे. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात 'हरी' बंदिस्त केले आहे. संतभूमी महाराष्ट्रात मद्य मुबलक सुरू आहे आणि भजन पूजन करणारे भाविक भक्तांवर गुन्हे दाखल होत आहे. 'भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल' असा ठाकरे सरकारचा कारभार सुरू आहे.
 
 
महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे, खुली करण्याची मागणी सातत्याने होत आहे. केंद्र सरकारनेही 4 जून 2020 रोजी नियमावली परिपत्रक जारी केले आहेत. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू केलेली आहेत. राज्यातही सामाजिक अंतर राखून आवश्यक नियम अटी शर्तीसह देवस्थाने धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तांकडून होत आहे. मात्र पुनश्च "हरिओम" म्हणून हरीला बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकरण अवस्थेत गेले आहे. राज्यातील देवस्थानाचे धार्मिक स्थळे सुरू करून भजन किर्तन व भजन परवानगी मिळावी या मागणीकडे निद्रस्त ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील संत-महंत आचार्य धर्माचार्य धार्मिक अध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी तसेच देवस्थाने तीर्थक्षेत्र येथील उदरनिर्वाह निगडित असलेले व्यावसायिक शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता राज्यात सर्वत्र देवस्थाने मंदिरे धार्मिक स्थळा समोर "घंटानाद आंदोलन"करणार आहे त्या घंटानाद आंदोलनात महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी जाहीर पाठिंबा आहे असून सक्रिय सहभाग असणार आहे, तरी भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व भाविक भक्त मंडळींनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सोशल डिस्टंसिंग चे नियम व अटी पाळून विरोध प्रदर्शन करावे असे आव्हान खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार एडवोकेट आकाश फुंडकर यांनी केले आहे