मांझी-नितीशकुमार भेटीने उंचावल्या भुवया

    दिनांक :27-Aug-2020
|
पाटणा,
हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्युलर) पक्षाचे अध्यक्ष जितनराम मांझी यांनी आज गुरुवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रालोआत परतण्यापूर्वी विधानासभा निवडणुकीच्या जागांबाबत वाटाघाटी करण्यासाठी त्यांनी नितीश यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तृळात सुरू झाली आहे.
 
jitan-manjhi_1   
 
नितीशकुमार यांच्या 1, अणेमार्गावर असलेल्या अधिकृत निवासस्थानी मांझी यांनी भेट दिली. स्थानिक मुद्दे आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असे त्यांनी राजकीय चर्चा फेटाळताना सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, ते 20 ऑगस्ट रोजी महाआघाडीतून बाहेर पडले आहेत.
 
 
नितीशकुमार यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. काही स्थानिक मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पडताना पत्रकारांना सांगितले.