कित्येक कर्मचार्‍यांच्या हाताला कामच नाही

    दिनांक :27-Aug-2020
|
- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा नफा घटला
नवी दिल्ली,
कोरोना महामारीमुळे इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी, विप्रो आणि एचसीएल टेक यासारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या हाती असलेले बरेचशे प्रकल्प रद्द झाले. त्यामुळे या कंपन्यांच्या कित्येक कर्मचार्‍यांच्या हाती कामच नसल्याची माहिती समोर आली आहे.
 
tcs-wipro_1  H  
 
यामुळे कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण घटेल तसेच बुद्धिमत्तेचा वापर करणेही कंपन्यांना अशक्य झाले आहे. वर्षभरापूर्वी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात काम होते, हे महत्त्वाचे. किमान कर्मचार्‍यांच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्राची मागणी पूर्ण करून घेतली जात आहे.
 
 
कोरोना महामारीमुळे या कंपन्यांच्या नियोजित प्रकल्पांना तसेच ज्या प्रकल्पांसाठी करार झाले, ते एकतर पुढे ढकलण्यात आले किंवा रद्द करण्यात आले आहेत. नव्या प्रकल्पांवर काम करण्यासाठी निवडक कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाणार असून, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती काही कंपन्यांनी दिली. मात्र, उपलब्ध मनुष्यबळाबाबत विश्लेषकांनी या कंपन्यांना इशारा दिला आहे.
 
 
सद्यःस्थितीत उपलब्ध असलेल्या आणि भविष्यातील संधींसाठी आम्ही प्रशिक्षित मनुष्यबळ नियुक्त करणार आहोत, अशी माहिती विप्रोच्या प्रवक्त्याने दिली. कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या सुरक्षित ठेवण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत. कर्मचार्‍यांचे कौशल्य वाढवण्यावर भर दिला जात असून, त्या आधारे उर्वरित प्रकल्प पूर्ण केले जातील, असेही या प्रवक्त्याने सांगितले.
 
 
काही लहान प्रकल्प एकतर रद्द झाले किंवा ते पुढे ढकलले आहेत. जोपर्यंत या प्रकल्पांवर काम सुरू असते, तोपर्यंत त्यांच्या हाती दुसरे प्रकल्प दिले जात नाहीत. त्याच प्रमाणे काही नवे प्रकल्प देखील येत आहेत. मागील काही तिमाहींमध्ये माहिती वापरण्याच्या प्रमाणाकडे नजर टाकली असता, त्याच्या वापर कमी झाल्याचे दिसून येईल, असे इन्फोसिसच्या मनुष्यबळ संसाधान विभागाचे प्रमुख कृष्ण शंकर यांनी सांगितले.
 
 
एप्रिल ते जून या तिमाहीत प्रशिक्षणार्थी कर्मचारी वगळता इन्फोसिसने उपलब्ध मनुष्यबळाचा 81.2 टक्के वापर करण्यात आला. मागील वर्षी समान तिमाहीत हाच वापर 83.5 टक्के होता, असेही त्यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र सध्या सेवेसाठी आकारलेले मूल्य योग्य असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. कित्येक प्रकल्प एकतर रद्द झाले किंवा पुढे ढकलले आहे. त्यामुळे हाती काम नसलेल्या कर्मचार्‍यांना कायम ठेवण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत, असे एचएफसी रिसर्चचे मुख्य कार्यकारी फिल फर्श्ट यांनी सांगितले.