सुशांतप्रकरणी अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे पथक नियुक्त

    दिनांक :27-Aug-2020
|
- 20 अधिकार्‍यांचा समावेश
मुंबई,
अभिनेता सुशांतिंसह राजपूत मृत्यू प्रकरणी अमली पदार्थांचा मुद्दा समोर आला आहे. त्या दृष्टिकोनातून तपास करण्यासाठी अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) चौकशीसाठी विशेष चमू तयार केली असून यात 20 अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सर्व अधिकारी दिल्लीहून मुंबईला पोहोचले आहेत, असे एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी गुरुवारी सांगितले. एनसीबीची ही विशेष चमू मुंबईत विशेषत: बॉलीवूडमधील ‘ड्रग्ज नेटवर्क’ची चौकशी करणार आहे. त्यादृष्टीने एनसीबीने आपला तपास सुरू केला आहे. या चमूचे प्रमुख उपसंचालक (एनसीबी) केपीएस मल्होत्रा आहेत.
 
sushant_1  H x  
 
रियासह पाच जणांविरोधात गुन्हे दाखल
यापूर्वी एनसीबीने बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, जया साहा आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध एनसीबीच्या विविध कलमांअन्वये गुन्हा दाखल केला. रियाचे मादकद्रव्य सेवनासंदर्भातील काही व्हॉट्स अॅप संभाषण समोर आल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
 
 
रियाच्या चार विविध व्हॉट्स अॅप संभाषणावरून ती 2017 पासून अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. ताज्या संवादात मात्र रिया स्वत:साठी मादकद्रव्य मागवतेय की दुसर्‍या कुणासाठी हे स्पष्ट झालेले नाही.