आजचे पंचांग नागपूर- २७ ऑगस्ट २०२०

    दिनांक :27-Aug-2020
|
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग
 
panchang_1  H x 
 
!!श्री रेणुका प्रसन्न!!
 
 
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २७ ऑगस्ट २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्र ५ शके १९४२
☀ सूर्योदय -०६:००
☀ सूर्यास्त -१८:३०
🌞 चंद्रोदय - २६:०१
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२१
⭐ सायं संध्या - १८:५१ ते २०:०४
⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:२८
⭐ प्रदोषकाळ - १८:५१ ते २१:१३
⭐ निशीथ काळ - २४:१३ ते २५:०१
⭐ राहु काळ - १४:०९ ते १५:४२
⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२१ ते दु.०१:५१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी दुधीभोपळा खावू नये. 🚫
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
 
 
♦️ लाभदायक-->>
लाभ मुहूर्त-- १२:३६ ते १४:०९ 💰💵
अमृत मुहूर्त-- १४:०९ ते १५:४२ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४५ ते १५:३८
पृथ्वीवर अग्निवास आहे🔥
शुक्र मुखात १६:१२ प.आहुती आहे.
शिववास १२:१३ प.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १२:१३ प.शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर - शार्वरी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा (सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - नवमी (१२:१३ प.नं.दशमी)
वार - गुरुवार
नक्षत्र - ज्येष्ठा (१६:१२ प.नं.मूळ)
योग - विष्कंभ (२१:४९ प.)
करण - कौलव (१२:१३ प.नं.तैतिल)
चंद्र रास - वृश्चिक (१६:१२ नं.धनु)
सूर्य रास - सिंह
गुरु रास - धनु
 
 
विशेष - ज्येष्ठा गौरी पूजन सूर्योदय ते दु.०४:१२ प., अदु:खनवमी, नंदानवमी, भागवतसप्ताहारंभ, रवियोग (अहोरात्र)
👉 या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 दत्तात्रेय वज्रकवच व अर्गला स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बृं बृहस्पतये नम:’’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉 गणेशास पायस(तांदुळाच्या खिरीचा) व दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हरभरा डाळ दान करावी.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशिंना दु.०४:१२ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
 

🔴या वर्षीचे गौरी आवाहन-संभ्रम
प्राचीन भारतीय सूर्यसिद्धांतीय कालगणनेनुसार यावर्षी गौरी आवाहन हे 25 ऑगस्ट 2020 रोजी नसून 26 ऑगस्ट 2020 रोजी आहे. ज्येष्ठा गौरी व्रत हे नक्षत्रप्रधान व्रत आहे. अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन करावे असे शास्त्र असल्यामुळे 26 तारखेसच सायंकाळ पर्यंत केव्हाही गौरी आवाहन करता येईल . 27 तारखेस ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन करावे व 28 तारखेस मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करावे.
 
 
भारतातील महाराष्ट्र व गुजरात सोडून बहुतांशी इतर सर्व राज्यात गौरी आवाहन 26 तारखेसच पंचांगात दिलेले असून तसे करणेच शास्त्र संमतआहे. त्या पंचांगांची यादी पुढीलप्रमाणे..
 
गणेश आपा पंचांग (वाराणसी)
शृंगेरी शंकराचार्य पंचांग
ह्रषीकेश पंचांग
आदित्य पंचांग
मदनमोहन मालवीय पुरस्कृत विश्व पंचांग
हनुमान पंचांग
अन्नपूर्णा पंचांग
महावीर पंचांग
पं.राजेश्वरशास्त्री जोशींचे धारवाड पंचांग
बुट्टी वीरभद्र पंचांग (आंध्र प्रदेश)
सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे)
ग्रहदृष्टी पंचांग (नागपूर)
 
पंचांगकर्ते -
पं देवव्रत बूट
आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.