'विरुष्का'च्या घरी येणार नवा पाहुणा

    दिनांक :27-Aug-2020
|
मुंबई,
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. 'विरूष्का' च्या घरी आता लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अनुष्का आणि विराट आई-बाबा बनणार आहेत. स्वत: विराट कोहली आणि अनुष्का शर्माने फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. सोबतच दोघांचा फोटोही शेअर केला आहे. 
 
virushka_1  H x 
 
'And then, we were three! Arriving Jan 2021' असे लिहित विराट आणि अनुष्काने ही गोड बातमी शेअर केली आहे. यानंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी डिसेंबर 2017 मध्ये इटलीमध्ये लग्न केले होते. मोजक्या लोकांसह विराट-अनुष्का लग्नबंधनात अडकले. चाहत्यांमध्ये विराट-अनुष्काची जोडी 'विरुष्का' म्हणून प्रसिद्ध आहे. विराट आणि अनुष्काची पहिली भेट एका शॅम्पूच्या जाहिरातीदरम्यान झाली होती. या भेटीचे रुपांतर आधी मैत्रीत नंतर प्रेमात झाले.