तंत्रज्ञानामार्फत साहित्य प्रकाशित होणे स्वागतार्ह

    दिनांक :03-Aug-2020
|
- नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
-ललित लेख संग्रहाचे प्रकाशन
 

pathak_1  H x W 
नागपूर, 
एकविसावे शतक हे डिजिटल क्रांतीचे युग आहे. तंत्रज्ञान माध्यमात आता साहित्यही उपलब्ध होऊ लागले आहे. अशा वेळी मराठी पत्रकार आणि लेखकांनी मुद्रित माध्यमाच्या मागे न लागता आपले साहित्य या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह ठरतो असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
 
नागपुरातील जेष्ठ पत्रकार व नागपूर इन्फोचे संपादकीय सल्लागार अविनाश पाठक लिखित थोडं आंबट थोडं गोड या ललित लेख संग्रहाच्या डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन आज नितीन गडकरी यांचे हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात झाले, त्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी लेखक अविनाश पाठक, अनुरूपा पाठक, बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, माजी खासदार अजय संचेती उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना गडकरी यांनी अविनाश पाठक यांच्या वाटचालीचे कौतुक करीत त्यांना अधिकाधिक लेखन करावे आणि दर्जेदार साहित्य वाचकांना द्यावे यासाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकार समाजात उघड्या डोळ्यांनी वास्तव बघत आणि अनुभवत असतात, त्यामुळे असे पत्रकारांनी केलेले लेखन हे अधिक वास्तववादी ठरते असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.
 
यावेळी गडकरी यांनी डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन केले आणि मुद्रित प्रतीचेही अनावरण केले. प्रारंभी अविनाश पाठक यांनी शाल व श्रीफळ देऊन गडकरी यांचे स्वागत केले. अविनाश पाठक लिखित पहिले पुस्तक दाहक वास्तव च्या प्रकाशन समारंभालाही नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते याची आठवण देत आता ११ व्या पुस्तकांचेही प्रकाशन गडकरींच्याच हस्ते होत असल्याचे अविनाश पाठक यांनी आवर्जून नमूद केले.
 
या ललित संग्रहात विविध वृत्तपत्रात प्रकाशित स्तंभातील निवडक ३८ लेखांचा यात समावेश आहे. यात १६ व्यqक्तची व्यक्तीचित्रे qकवा आठवणी सांगणारे लेख समाविष्ट असून त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कांचन गडकरी, डॉ. द.भि. कुळकर्णी, मुकुंदराव किर्लोस्कर, डॉ. विनय वाईकर, वामनराव चोरघडे, पी.आर. जोशी, विनयकुमार काटे, विकास आणि प्रकाश आमटे, आकाशानंद, स्मिता तळवलकर आणि एकनाथ ठाकूर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे वडील स्व. गंगाधरराव फडणवीस, माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे अशा मान्यवरांवरील लेखांचा समावेश आहे.
 
डॉ. श्रीपाद जोशी यांची प्रस्तावना लाभली आहे. तर दिवंगत थोर साहित्यिक श्रीमती गिरिजा कीर यांच्या स्मृतिला हे पुस्तक अर्पण करण्यात आले आहे.