देशांतर्गत क्रिकेट मोसम १९ नोव्हेंबरपासून

    दिनांक :09-Aug-2020
|
नवी दिल्ली, 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आगामी १९ नोव्हेंबरपासून देशांतर्गत क्रिकेट मोसम सुरु करण्याच्या विचारात आहे.

bcci _1  H x W: 
 
सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेने क्रिकेट मोसमाला सुरुवात होणार आहे, परंतु विविध आयपीएल संघातील भारतीय खेळाडूंना विलगीकरणामुळे पहिल्या फेरीतील काही सामने खेळता येणार नाही.
 
कोरोना संकटामुळे यंदा देशांतर्गत क्रिकेट मोसमाला विलंब होत आहे. केवळ मुश्ताक अली चषक व रणजी करंडक स्पर्धा (१३ डिसेंबर ते १० मार्च) होणार असून यात २४५ सामने खेळले जाणार आहेत.
 
या स्पर्धेच्या तात्पुरत्या तारखा असून याला अंतिम मंजुरीसाठी अध्यक्ष गांगुली व सचिव जय शाह यंच्याकडे पाठविण्यात आली आहे, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
यावर्षी विजय हजारे चषक, दुलिप करंडक किंवा चॅलेंजर्स सीरिज होणार नाही. इराणी करंडकसुद्धा आयोजित करण्याची कोणतीही तरतूद नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.