शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने सर्व खेळाडू उत्तम : कोहली

    दिनांक :12-Sep-2020
|
दुबई, 
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मिळालेल्या पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मैदानावर उतरलेल्या आपल्या खेळाडूंविषयी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने आनंद व्यक्त केला आहे. संघातील प्रत्येक सदस्य शारीरिकदृट्या तंदुरुस्त असल्याचे तो म्हणाला.
 

virat kohali_1   
 
संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्या सराव सत्रापासून मला बरे वाटत असल्याचेही त्याने ट्विटरवर टाकलेल्या एका ध्वनीचित्रफितीत म्हटले. दोन आठवड्यांच्या सराव सत्रादरम्यान संघव्यवस्थापन खेळाडूंना दुखापत न होण्याबाबत काळजी घेत आहे. आम्हालाही कुणाला चिडवणे किंवा दुखापतीकडे ढकलणे आवडत नाही. जर काही घडले तर तो खेळापासून दूर जाईल, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे आम्ही संतुलित मार्गाने पुढे जात आहो, असेही तो म्हणाला.
 
 
आम्ही सहा दिवसांत सहा सत्रे करण्यासारखा वेडेपणा करू इच्छित नाही. आम्ही आपल्या खेळाडूंना थोडी उसंतही दिली आहे, जेणेकरून तो पुढील सराव सत्रातही सहभागी होऊ शकेल, असे तो म्हणाला. पाच महिन्यानंतर मैदानावर उतरल्यानंतर पहिले काही दिवस आम्ही केवळ डोळे बघत होतो. सर्वकाही वेगळे वाटत होते. आम्ही क्रिकेटच्या आणि येथील वातावरणात समरस होण्याचा प्रयत्न करीत होतो, असेही त्याने सांगितले.