आयपीएलमध्ये दिसणार चीअरलीडर्स!

    दिनांक :12-Sep-2020
|
दुबई, 
यावर्षी संयुक्त अरब अमिरातमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान कोरोना विषाणूमुळे स्पर्धा प्रेक्षकांविना जैव-सुरक्षित वातावरणात होणार आहे. परंतु, संघमालकांनी रिकाम्या स्टेडियममध्येही चीअरलीडर्स व प्रेक्षकांची उपस्थिती असल्याचा आभास निर्माण करण्याची संपूर्ण तयारी केली आहे.
 


chiars girls 2_1 &nb 
 
प्राप्त माहितीनुसार रिकाम्या स्टेडियममध्ये मोठ-मोठ्या स्क्रीनवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया व चीअरलीडर्सचे ध्वनीचित्रफीत दाखविले जाणार आहेत. अर्थात, दूरदर्शन संचावर सामने बघणार्‍या प्रेक्षकांना प्रत्येक चौकार व षट्कारांवर चीअरलीडर्स नाचताना दिसणार आहेत. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या प्रतिक्रिया दाखविण्यात येणार आहे.
 
 
वास्तविक सामन्यादरम्यान स्टेडियम पूर्णपणे रिकामे राहणार आहेत, त्यामुळे काही संघमालकांनी आधीच चीअरलीडर्सचे चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला व या चित्रफीत चौकार, षट्कार व गडी बाद झाल्यावर दाखविण्यात येणार आहे. काही संघांनी चाहत्यांच्या प्रतिक्रियांचे सुद्धा चित्रीकरण करून ठेवले आहे, असे एका संघाच्या मालकाने सांगितले आहे. आयपीएलमध्ये पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्जदरम्यान खेळविला जाईल. सर्व 60 सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाहमध्ये होतील.