अमेरिकेपासून जागतिक शांततेला धोका

    दिनांक :13-Sep-2020
|
- चीनच्या संरक्षण मंत्रालयाचा आरोप
बीजिंग, 
चिनी लष्कराच्या विस्तारवादी धोरणावर अमेरिकेने टीका केल्यानंतर जळफळाट झालेल्या चीनच्या संरक्षण मंत्रालयाने, अमेरिकेपासून जागतिक शांततेला सर्वांत मोठा धोका असल्याचा आरोप केला. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने 2 सप्टेंबर रोजी चिनी लष्कराची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा आणि इतर देशांच्या सीमांमध्ये त्यांची सुरू असलेली लुडबूड यावर वार्षिक अहवाल सिनेट सभागृहात सादर केला होता. चीनपासून केवळ अमेरिकेलाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेलाही धोका निर्माण झाला असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला होता.
 
 
woo kiyan_1  H
 
यावर आक्षेप घेताना, चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वु कियान यांनी, हा अहवाल म्हणजे, अमेरिकेच्या मनात चीनविषयी असलेला द्वेष दाखवत असल्याचे म्हटले आहे. चीनने नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. उलट, गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिका जे धोरण राबवत आहे, ते पाहू जाता, या महासत्तेने अनेक देशांमध्ये अस्थिरता निर्माण केली आहे. प्रादेशिक अस्थिरता ही अमेरिकेचीच देण आहे. या देशाने नेहमीच आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून, जागतिक शांतता धोक्यात आणली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
 
 
इराक, सीरिया, लिबिया, अफगाणिस्तान आणि इतर देशांमध्ये मागील दोन दशकांच्या काळात अमेरिकेने जे आक‘मणकारी धोरण स्वीकारले, त्यामुळे आठ लाखांवर लोकांचा मृत्यू झाला आहे, असं‘य लोक अपंग झाले आहेत. अमेरिकाच जागतिक शांततेसाठी घातक आहे, हेच यावरून सिद्ध होत असल्याचे कियान यांनी सांगितले. आपण स्वत: किती आक‘मणकारी आहो, याकडे लक्ष न देता हा देश इतर देशांवर आक‘मणकारी आणि विस्तारवादी होण्याचा ठपका ठेवतो, आमच्या सैनिकांना दोषी ठरवितो. अमेरिकेने आमच्याविरोधातील अपप्रचार थांबवावा आणि दोन्ही देशांमधील संबंध कसे सुरळीत होतील, यावर भर द्यायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला.