'दादीं'च्या मदतीसाठी धावले सहकलावंत

    दिनांक :13-Sep-2020
|
मुंबई,
दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेली आजी अर्थात अभिनेत्री सुरेखा सिकरी सध्या आजारी आहेत. त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही बातमी वाचल्यावर त्याच चित्रपटात त्यांच्या मुलाची भूमिका केलेले अभिनेता गजराज राव पुढे आले आणि त्यांनी सुरेखा यांच्या सचिवाशी संपर्क साधून त्यांना लागेल ती मदत करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तर चित्रपटाचे दिग्दर्शक अमित शर्मा हेदेखील त्यांना पूर्ण मदत करीत आहेत. ‘मी सध्या गोव्यात असलो, तरी सुरेखा यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. त्यांच्या उपचारात कसलीही कमतरता येणार नाही यासाठी प्रयत्न करेन’, असे ते म्हणाले.
 
surekha sikri_1 &nbs 
 
‘बधाई हो’ हा एका महत्त्वाच्या विषयावर आधारित एक कौटुंबिक चित्रपट होता. त्यातील कुटुंब एकमेकांना साथ देणारे दाखविण्यात आले होते. पडद्यामागे देखील त्यातले कलाकार एकमेकांना तशीच साथ देताना दिसत आहेत.