दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन टिपेश्वर अभयारण्यात

    दिनांक :13-Sep-2020
|
पांढरकवडा, 
तामिळ आणि तेलगू चित्रपटातील स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जुन याने रविवार, 13 सप्टेंबर रोजी सकाळी टिपेश्वर अभयारण्यात जंगल सफारी करून अभयारण्याचे सौंदर्य न्याहळले.
 


y13Sep Allu Arjun_1  
 
अल्लू अर्जुन याने अनेक दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटांत काम केले असून तो वन्यजीव प्रेमी असल्याने त्यालाही टिपेश्वरच्या सौंदर्याने भुरळ घातली. टिपेश्वर अभयारण्यात व्याघ‘दर्शन सहज होत असल्याने अनेकांचा लोढा या अभयारण्याकडे वाढत आहे. रविवारी सकाळी 6 च्या सुमारास त्याने सुन्ना प्रवेशद्वारातून प्रवेश घेऊन 4 तास जंगलात निसर्गाचा आनंद लुटला. परंतु त्यास व्याघ‘ दर्शन झाले नाही. सकाळी अल्लू अर्जुन अभयारण्यात आल्याची वार्ता पसरताच त्यास पाहण्यासाठी प्रवेशद्वारावर युवकांची मोठी गर्दी उसळली होती. त्यानेसुद्धा चाहत्यांना निराश केले नाही. टिपेश्वर अभयारण्यात चित्रपटातील मोठा कलावंत येण्याची ही पहिलीच वेळ होती.