कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण 78 टक्के

    दिनांक :14-Sep-2020
|
- चोविस तासांत आढळले 92 हजार नवे संक्रमित 
नवी दिल्ली, 
मागील चोवीस तासांमध्ये 92,071 नवे कोरोनाबाधित आढळून आल्याने, देशातील एकूण संक‘मितांची सं‘या आज सोमवारी 48.46 लाखांच्या घरात गेली आहे. यातही समाधानाची बाब म्हणजे, 77,512 बाधित बरे झाल्याने, आतापर्यंत बरे झालेल्यांची टक्केवारी 78 इतकी झाली आहे.
 
corona_1  H x W
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध‘प्रदेश, उत्तरप्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यांचा एकूण कोरोनाबाधितांमधील वाटा 60 टक्के आहे. आतापर्यंत 37.80 लाख संक‘मितांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. याच चोवीस तासांच्या काळात 1136 बाधितांचा मृत्यू झाल्याने, देशातील कोरोनाबळींची सं‘या 79,722 इतकी झाली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
 
देशात बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढ असून, ही समाधानाची बाब आहे. बरे होण्याच्या प्रमाणात दररोज वाढत आहे. यामुळे सकि‘य आणि बरे होणारे यातील अंतरही वाढत आहे.
 
- दीपक कोचर कोरोनाबाधित
आयसीआयसीआय बँकेतील कर्जघोटाळ्यात दलाली घेतल्याप्रकरणी ईडीने अलिकडेच अटक केलेल्या दीपक कोचरला कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला असून, त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
हा दलालीचा पैसा कोचरने बेकायदेशीर सावकारी कारवायांसाठी वापरला असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी त्याला गेल्या आठवड्यात अटक केली होती. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. आज त्याचा अहवाल सकारात्मक आला, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.