व्हीसीएमध्ये कोरोनाबाधित ?

    दिनांक :14-Sep-2020
|
- सात दिवसासाठी बंद राहणार व्हीसीए
नागपूर, 
शहरात कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस दिवस वाढत असून कोरोनाने आता सर्वीकडे आपली पायमुळे रोवली आहे. संयुक्त अरब अमिरीती येथे होणाèया आयपीएलमध्येही काही खेळाडू कोरोनाबाधित सापडले होते. त्यामुळे कोरोना नाही असे एकही क्षेत्र आता उरलेले नाही. शहरातील सिव्हील लाईन्स येथील विदर्भ क्रिकेट संघटना- व्हीसीए येथे देखील कोरोनाबाधित सापडले असून व्हीसीए कार्यालय १५ ते १९ या काळासाठी बंद ठेवण्यात आले असल्याची माहीती विश्वसनीय सुत्राकडून मिळाली आहे.
 
vca_1  H x W: 0
 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही दिवसांपुर्वी टाळेबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे मैदाने देखील बंद करण्यता आली होती. त्यामुळे सर्व खेळाडूंनी घरीच सराव केला. क्रिकेटपटू देखील आभासी माध्यमातून फिटनेस करीत होते. मात्र आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने सर्वच क्षेत्र पुर्वव्रत होउ लागली आहे. भारतात सोडून इतर ठिकाणी क्रिकेटही कोरोना नियमांच्या आधारे सुरु झाले आहे.
 
भारतातही क्रिकेट सुरु व्हावे या उद्देशाने प्रयत्न सुरु होते. याच पाश्र्वभुमीवर व्हीसीए प्रशासन देखील क्रिकेटसाठी कधी परवागनी मिळते याची वाट बघत होते. त्यादृष्टीने मैदानाची देखभाल आणि मैदान खेळण्यासाठी सज्ज मिळावे यासाठी कर्मचारी प्रयत्नरत होते. परंतू आता व्हीसीए मध्ये ६ ते ७ ग्राउंडमन कोरोना बाधित सापडले असल्याची माहीती आहे. त्यामुळे आता व्हीसीए १९ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहीती सुत्राकडून मिळाली. परंतू याबाबत सत्यता तपासण्यासाठी व्हीसीएचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता अजूनपर्यंत याबाबत माझ्याकडे माहीती नसल्याचे त्यांनी सांगितले.