त्या स्थलांतरित मजुरांचा नेमका आकडा उपलब्ध नाही

    दिनांक :14-Sep-2020
|
-लोकसभेत सरकारची माहिती
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली,
टाळेबंदीच्या काळात देशाच्या विविध भागात किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याबाबतचा नेमका कोणताही आकडा उपलब्ध नसल्याचे आज सोमवारी लोकसभेत सांगण्यात आले.

maigreshiom_1   
 
टाळेबंदीत आपल्या घरी परतणार्‍या अनेक स्थलांतरित मजुरांचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. अशा किती मजुरांचा घरी परतताना मृत्यू झाला, अशा मजुरांची राज्यनिहाय सं‘या किती आहे, अशा मजुरांना केंद्र वा राज्य सरकारतर्फे काही नुकसान भरपाई देण्यात आली का, अशी विचारणा लोकसभेत करण्यात आली होती.
 
घरी परतताना रस्त्यात किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याबाबतची कोणतीच आकडेवारी सरकारजवळ उपलब्ध नाही. टाळेबंदीमुळे लाखो स्थलांतरित मजुरांनी आपल्या गावाच्या दिशेने पलायन केले, यादरम्यान अनेक मजुरांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला, असे श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले.
 
स्थलांतरित मजुरांच्या मृत्युची नेमकी माहिती नसल्यामुळे त्यांना नुकसानभरपाई वा आर्थिक मदत देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.
 
कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटात एक राष्ट्र म्हणून या स्थलांतरित मजुरांना केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था याच्यासह अनेकांनी मानवीय भूमिकेतून मदत केल्याचे गंगवार यांनी स्पष्ट केले.