सौगत राय यांचे ते विधान कामकाजातून हटवले

    दिनांक :14-Sep-2020
|
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्या पेहराव्याबाबत तृणमूल काँग‘ेसचे ज्येष्ठ सदस्य सौगत राय यांनी केलेल्या विधानामुळे लोकसभेत आज गदारोळ झाला. अखेर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ते विधान कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले.
सौगत राय यांनी निर्मला सीतारामन् यांच्या पेहराव्याबाबत केलेल्या विधानावर भाजपाच्या सदस्यांनी तीव‘ आक्षेप घेतला. हे विधान महिलांचा अपमान असल्याचे सांगत सांसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सौगत राय यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
 
tbh_1  H x W: 0
 
सौगत राय मात्र आपल्या भूमिकेवर कायम होते, आपल्या बोलण्यात चूक झाल्याचा कोणताच भाव त्यांच्या वागणुकीत दिसत नव्हता. माफी मागणे तर दूर, पण मी चुकीचे काय बोललो, यात गैर काय आहे, अशी विचारणा ते वारंवार करत होते. त्यामुळे भाजपा सदस्य आणखी संतप्त झाले. सभागृहातील वरिष्ठ सदस्य असतांनाही सौगत राय यांनी एखाद्या सदस्याच्या पेहरावाबाबत विधान करणे आक्षेपार्ह आहे. हा महिलांचा अपमान आहे,
 
त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागावी, अशी मागणी जोशी यांनी केली. मात्र सौगत राय माफी मागण्यास तयार नसल्यामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ते विधान कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले. त्यामुळे सभागृहातील वातावरण शांत झाले.
 
नव्या व्यवस्थेला सभागृहाची मंजुरी
लोकसभेचे अधिवेशन यावेळी वेगळ्या परिस्थितीत घेण्याच्या आणि त्यासाठी करण्यात आलेल्या नव्या व्यवस्थेला आज लोकसभेने मंजुरी दिली. लोकसभेच्या यावेळच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास नसल्याबाबत विरोधी पक्षांनी तीव‘ हरकत घेतली. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला.