मादकपदार्थांसाठी रिया करायची 'या' फोनचा वापर

    दिनांक :14-Sep-2020
|
- एनचीबीची माहिती
मुंबई,
मादकपदार्थ मागविण्यासाठी रिया चक्रवर्ती  आपल्या आईच्या मोबाईल फोनचा वापर कराची. या फोनवरूनच ती चॅट करून, मादकपदार्थांची नोंदणी करीत होती, अशी माहिती एनसीबीने आज सोमवारी दिली.

riya_1  H x W:
संध्या असे रियाच्या आईचे नाव असून, तिचा फोन एनसीबीच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतला आहे. या फोनमधील चॅट्स आणि व्हॉट्सअ‍ॅप संदेशाचा अभ्यास केला जात आहे. आम्ही आधी रियाकडे या फोनची मागणी केली होती, पण तिने त्यास नकार दिला होता. अखेर तिच्या आईला समन्स धाडून हा फोन मागविण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.
आईच्या याच फोनवरून रिया आपल्या अन्य मित्रांशी संपर्क साधायची. यात काही मादकपदार्थांची तस्करी करणार्‍यांचेही क‘मांक आहेत. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. रियाचा व्हॉट्सअ‍ॅपवरील मित्रपरिवारही याच फोनवर आढळून आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
या फोनचाच वापर करून तिने मादकपदार्थ मागितले आहेत. आपल्या फोनचा तिने यासाठी कधीच वापर केला नव्हता. अतिशय चतुरपणे तिने आईच्या फोनचा वापर केला. तिच्या आईलाही याची माहिती होती, असेही सूत्रांचे मत आहे.