जिल्ह्यात 80 बाधितांची वाढ, तिघांचा मृत्यू

    दिनांक :15-Sep-2020
|
अकोला, 
जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावामुळे सुरू असलेले मृत्यू सत्र थांबत नसून मृत्यू दर कमी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. मंगळवार, 15 सप्टेंबर रोजी 3 जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या 189 वर पोहोचली आहे. तर त्याचवेळी 80 नवे बाधित आढळले आहे. एकूण बाधित रुग्णसंख्या 5796 वर पोहोचली असून क्रियाशील बाधित 1204 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
Akola 1_1  H x
 
मंगळवार, 15 सप्टेंबर रोजी प्रयोगशाळा चाचणीत 65 जणांचा अहवाल बाधित आढळला. त्यात दापूरा येथील 6, अकोट येथील 4, इमरॉल्ड कॉलनी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येक 3, गोडेबोले प्लॉट, जठारपेठ, मोठी उमरी, बाळापूर, मूर्तिजापूर येथील प्रत्येकी 2, तर सोपीनाथ नगर,अशोक नगर, शास्त्री नगर, लहान उमरी, लंक्कडगंज, बोरगाव मंजू, संभाजी नगर, मलकापूर, नानकनगर, दहिगाव गावंडे, नागे लेआऊट, आश्रय नगर, कौलखेड, चांदुर, गाडगे नगर, आदर्श कॉलनी, जूना तापडीया नगर, सिव्हील लाईन, जीएमसी, केशव नगर,सागूर अडगाव, कृषी नगर, संभाजी नगर, कार्ला बु., तेल्हारा, चोहट्टा बाजार, खिरपूरी ता. बाळापूर, रुस्तमाबाद व कटयार, मूर्तिजापूर, खदान, डाबकी रोड, रेल्वे स्टेशन जवळ, शंकर नगर, जीएमसी हॉस्टेल, मलकापूर, मूर्तिजापूर रोड, चांदूर व गिता नगर येथील प्रत्येकी 1 प्रमाणे रहिवासी आहे.
 
तर जलद चाचणीत 15 जण बाधित आढळले. त्यात अकोट 9, तेल्हारा 1, आयएमए 1 तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 4 जणांचा समावेश आहे. दरम्यान कोरोनाने तिघांचा बळी घेतला. त्यात राजेश्वर कॉलनी येथील 56 वर्षीय महिला, बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील 65 वर्षीय महिला तर मूर्तिजापूर येथील 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर उपचारानंतर 31 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली.