जलवाहिनी फोडून वीजवाहिनी टाकण्याची कामे

    दिनांक :15-Sep-2020
|
-नव्या रस्त्याची पुन्हा दैनावस्था
-दुरुस्तीसाठी दीर्घकालिन प्रतीक्षा
नागपूर, 
नव्याने तयार झालेले रस्ते लगेच खोदकाम करुन फोडायचे हा नागपूरच्या मनपा प्रशासनाचा नित्याचा उद्योग आहे. सध्या शहरात एकही विकासकाम सुरू नाही मात्र, खोदकामे करुन शहर विद्रुप करण्याचे काम अतिशय युद्धपातळीवर सुरू असतात. मागील अनेक वर्षापासून शहरात अंतर्गत वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. आता ते धंतोली, रामदासपेठ भागात सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी तयार झालेल्या सिमेंट रस्त्याच्या बाजूचा भागात खोदकाम करुन हा पूर्ण रस्ता विद्रुप करण्याचे काम सुरू आहे.
 
chala_1  H x W:
 
विशेष म्हणजे ही कामे खाजगी कंत्राटदारांमार्फत करण्यात येतात आणि मनपा प्रशासनातील अधिकारी आणि अभियंत्याची त्यांचे साटेलोटे असते, ही बाब अनेक प्रकरणात सिद्ध ्रझाली आहे. यावेळी तर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फोडून वीजवाहिनी टाकण्याचे काम काचीपुरा ते रामदासपेठ रस्त्यावर सुरू आहे. महत्प्रयासाने फार विलंबाने पूर्ण झालेला हा सिमेंट रोड आता पुन्हा खोदण्याचे काम सुरू आहे.
 
या कामामुळे सोमवारी पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली आणि रामदासपेठ भागातील पिण्याच्या पाणी अक्षरश: रस्त्यावर वाहत आहे. याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही.
 
या प्रकाराविषयी धंतोली भागात देखील अशाप्रकारे काम करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसलेल्या अकुशल कामगारांना हे काम देण्यात येते आणि ते आपल्यापरिने अशी कामे करतात आणि शहराचे लाखो रुपयाचे नुकसान करतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कुणी मनपा अभियंता देखील घेत नाही. कंत्राटदारांना रोड कटिंग चार्जेस भरायचे आणि मनपा अधिकाèयांनी त्यांना काम करण्याची परवानगी द्यायची एवढेच काम मनपा कार्यालयात होते की काय अशी शंका आता येत आहे.
 
कोरोनाचे कारण सांगून विकासकामे बंद आहे. त्यासाठी भौतिक दूरतेचा मुद्दा उपस्थित करण्यात येतो मात्र खोदकाम करताना कोणतेही नियम न पाळता केवळ कंत्राटदाराने म्हटले त्यादिवशी ही परवानगी देण्यात येते. विकासकामे बंद आहेत तर ही कामे देखील बंद असणे गरजेचे आहे. पण विघातक आणि त्रासदायक कामे सुरू असतात आणि विधायक कामांसाठी मात्र नियमांची आडकाठी आणून ही कामे बंद ठेवण्यात येतात.
 
वीज वाहिनी टाकणाèया कंत्राटदाराला जर एवढी लोकांची qचता आहे तर त्यांना मार्च ते मे महिन्यात कामे करण्याची परवानगी देऊन पहा ते लोक कामे करतील तर सांगा. मनपा प्रशासनात केवळ पैशाचा व्यवहार करण्यात सर्व गुंतले आहेत. या कंत्राटदारांना सिमेंट रोडचे काम सुरू असताना हे केबल टाकले असते तर आज तयार झालेला रस्ता पुन्हा खोदण्याची वेळ आली नसती. एवढा विचार करण्याची कंत्राटदार आणि अधिकारी यांची क्षमताच नाही. त्यामुळे शहराची स्थिती अशी आहे.
कोटयवधींचा दंड हवा
शहरातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी महत्त्वाचे आहे. तो विषय प्राधान्यक्रमात येतो. पण या कंत्राटदाराने ही पाईपलाईन फोडली आणि पाणी वाया गेले. त्यामुळे वाया गेलेले शुद्ध पाणी आणि पाईपलाईन दुरुस्तीचा खर्च आणि त्यावर व्याज असा कोट्यवधींचा दंड या कंत्राटदाराला करणे अपेक्षित आहे. अन्यथा या कामांना शिस्त लागणार नाही. स्वार्थी आणि नफेखोर कंपन्यांना सामाजिक कार्याशी देणे-घेणे नसते. त्यांना तो धडा शिकविण्याची गरज आहे, ही बाब अधिकाèयांनी देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे. याची वसुली परवानगी देणाèया अधिकाèयांकडून देखील होणे आवश्यक आहे.