विदर्भ क्रिकेट संघाच्या कामगिरीने प्रभावित झालो

    दिनांक :15-Sep-2020
|
- युवा क्रिकेटपटू अंशुमन रथने व्यक्त केल्या भावना
नागपूर,
विदर्भ क्रिकेटपटूंमध्ये प्रचंड क्षमता आणि कौशल्य आहे. शिवाय मागील अनेक वर्षापासून विदर्भ क्रिकेट संघ हा सर्वच क्रिकेट स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करीत आहे. सर्व वयोगटाच्या स्पर्धेत विदर्भने अqजक्य राहण्याचा विक्रम देखील नोंदविला आहे. मागील तीन वर्षांपासून विदर्भ क्रिकेट संघ चांगली कामगिरी करीत आहे. त्यामुळे विदर्भच्या क्रिकेटपटूंमध्ये असणाèया विशेष कौशल्यामुळे मी प्रभावित झालो आहे. त्यामुळे विदर्भ रणजी संघाकडून क्रिकेट खेळण्याचा माझा निर्धार असल्याची भावना हाँगकाँगचा माजी युवा क्रिकेटपटू अंशुमन रथ याने व्यक्त केली.
 
JH_1  H x W: 0
भारतीय वंशाचा असलेला अंशुमनचे कुटूंब हे ओडिसातील भुवनेश्वर येथील आहे. त्याचे वडील व्यवसायासाठी हाँगकाँग येथे स्थायिक झाले. त्यानंतर तेथूनच अंशुमनच्या क्रिकेटची सुरुवात झाली. क्रिकेटमध्ये हाँगकाँग संघाचे नेतृत्व देखील अंशुमनने भुषविले असून मिडल्स सिक्स- इंग्लंड मध्ये तो काउंटी देखील खेळला आहे.
 
यावेळी पुढे बोलतांना अंशुमन म्हणाला, मला निरंतर क्रिकेट खेळायचे आहे. ते हाँगकाँग मध्ये शक्य नाही. भारतात मोठ्या प्रमाणात घरगुती क्रिकेट स्पर्धा होतात. मागील काही वर्षांपासून विदर्भ क्रिकेट संघाने प्रत्येकच क्रिकेट स्पर्धा प्रकारात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. याशिवाय विदर्भ क्रिकेटमध्ये झालेला बदल आणि येथील खेळाडूंच्या कामगिरीमुळे तसेच क्रिकेट क्लबमध्ये मिळणाèया अत्याधुनिक सोयी- सुविधांमुळे क्रिकेट खेळण्यासाठी विदर्भाची निवड केल्याचे त्याने सांगितले.
 
अंशुमन मागील एक वर्षापासून नागपूरात खामल्यात किरायाने राहतो. कोणत्याही संघटनेकडून क्रिकेट खेळण्यासाठी त्याला कमीतकमी एक वर्ष वेळ त्या ठिकाणी घालवावा लागतो. त्यानुसार अंशुमन मागील एक वर्षापासून दीक्षाभुमी चौकातील कुर्वेज शाळा परिसरात असणाèया ‘एनसीए- नागपूर क्रिकेट अकादमीङ्क मध्ये अकादमीचे संचालक माधव बाकरे यांच्या मार्गदर्शनात सराव करीत आहे. विदर्भ क्रिकेट संघाशी जुळण्यासाठी सर्वच नियम, अटी पुर्ण केल्या असून आता फक्त कागदपत्र व्यवहार व्हायचे आहे. तसेच सध्या कोरोनामुळे घरगुती क्रिकेट बंद आहे. परंतू ज्यावेळी क्रिकेट सुरु होईल त्यावेळी विदर्भाकडून क्रिकेट खेळण्यासाठी अंशुमन रथ देखील उपलब्ध राहणार आहे.
सध्या कसोटी क्रिकेटकडेच लक्ष
क्रिकेट म्हटलं तर युवा खेळाडूंचा भर सध्या आयपीएल आणि टी२० क्रिकेट प्रकारावर असतो. मात्र अंशुमन रथ याला अपवाद ठरला आहे. आयपीएलच्या सामन्यात खेळायला निश्चितच आवडेल, परंतू माझे संपुर्ण लक्ष हे घरगुती आणि मल्टी डेज चालणाèया क्रिकेटकडे आहे. तसे तर तिन्ही प्रकारातील क्रिकेट महत्वाचे आहे. परंतू आपण झटपट क्रिकेट खेळण्याच्या उद्देशाने सराव करीत नाही. अधिक काळ क्रिकेट खेळण्यासाठी घरगुती क्रिकेटवर लक्ष देणे गरजेचे असून आगामी काळात भारतीय संघाकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न माझे असल्याचे अंशुमनने सांगितले.
क्रिकेटवरच पुर्णपणे लक्षकेंद्रीत असणारा खेळाडू
अंशुमन रथ हा अवघ्या २२ वर्षाचा युवा क्रिकेटपटू आहे. क्रिकेटमध्ये त्याला काय प्राप्त करायचे आहे. आपले ध्येय्य काय याची पुर्ण माहीती त्याच्याकडे आहे. आपले लक्ष्य प्राप्त करण्यासाठी कोणत्या टप्प्याने जायचे, कसा सराव करायचा त्याची पुरेपुर माहीती अवघ्या २२ व्या वर्षीच त्याच्याकडे आहे.
- माधव बाकरे- संचालक - एनसीए