आर्वी नपची बहुप्रतीक्षित आमसभा कोरम अभावी रद्द

    दिनांक :15-Sep-2020
|
तभा वृत्तसेवा
आर्वी,
आर्वी नगरपरिषद सद्ध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नगरसेवकांमध्ये ताळमेळ नसल्याने आर्वी शहरात चर्चेचा विषय बनला आहे. आज नगरपरिषदचे पिठासीन अधिकारी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आभासी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. परंतु या सभेला २३ सदस्यांपैकी फक्त ४ सदस्यांनी हजेरी लावली. त्यामुळे शेवटी हि सभा तहकूब करण्यात आली.
 
 
arwi_1  H x W:
 
आर्वी नगरपरिषदची प्रशस्त इमारत असतांनाही अभासी सभा घेण्याची गरज नसल्याचे काही नगरसेवकांनी सांगत कोरोना संबंधित विविध विषयांवर विविध विभागांच्या सभा तसेच पालकमंत्र्यांच्या सभाही नगरपरिषद ईमारती मध्ये पार पडल्यावर आभासी चर्चा घेण्याची गरज का पडली असा सवाल केला आहे. आर्वी नगरपरिषद मध्ये भारतीय जनता पक्षाचे २३ पैकी २३ ही उमेदवार निवडून आले असतांनाही अंतर्गत कलहामुळे आर्वीवासींमध्ये आर्वी नगरपरिषद मध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे.
 
 
 
या संदर्भात नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांच्या सोबत सम्पर्क केला असता काही नगरसेवक आभासी सभेत कनेक्टिव्हिटी नसल्याने सहभागी होऊ शकले नाहीत तर दोन नगरसेवकानी काम असल्याने सहभागी होऊ शकले नाही त्यामुळे कोरम अभावी ही सभा रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले.