बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी! ही कंपनी देणार ३० हजार लोकांना नोकऱ्या

    दिनांक :15-Sep-2020
|
नवी दिल्ली,  
कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्यापासून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. आर्थिक आघाडीवर व्यवहार अद्याप सुरळीत झालेले नाहीत. त्यामुळे ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना अद्याप काम मिळालेले नाही. अनेक कंपन्यांमध्ये अजूनही पगार कपात सुरू आहे. या पृष्ठभूमीवर एक आनंददायक बातमी आली आहे.
 
job01_1  H x W:
 
भारतातील ई-कॉम एक्सप्रेस ही कंपनी सण/उत्सवाच्या काळात ३० हजार लोकांना नोकèया देणार आहे. वस्तूंची घरपोच सुविधा देण्यासह वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणारी कंपनी म्हणून ई-कॉम एक्सप्रेसची ख्याती आहे. पुढील काही आठवड्यात ३० हजार लोकांना पुढील आगामी सण आणि उत्सवांच्या काळात रोजगार देणार आहे. हे रोजगार अस्थायी स्वरूपाचे असतील. ई-कॉमर्स कंपन्यांकडून या काळात व्यवसायाची वाढ अपेक्षित आहे.
 
त्यामुळे नव्या मनुष्यबळाची गरज भासणार आहे. कोरोना संकटाच्या आधी या कंपनीत २३ हजार लोक काम करीत होते. पण, टाळेबंदी आणि त्यानंतर ग्राहकांची आभासी मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने गेल्या काही महिन्यात ७ हजार ५०० कर्मचाऱ्यांची  नियुक्ती केली आहे. कोरोना काळात किराणा सामान, औषधे आणि अन्य वस्तूंसाठी ई-कॉमर्सचा वापर केला गेला.
 
कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मनुष्यबळ विकास विभागाचे अधिकारी सौरभदीप सिंगला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, कोरोनाच्या काळात ई-कॉमर्स व्यवसाय एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचला. आता सण आणि उत्सवांच्या काळात ई- कॉमर्स कंपन्या ग्राहकांसाठी आकर्षक व फायदेशीर योजना तयार करत आहेत. त्यामुळे त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. ई-कॉमर्स कंपन्यांनी नोंदविलेली मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही नव्या नियुक्त्या सुरू केल्या आहेत. नव्या नोकऱ्यांची नियुक्ती १० ऑक्टोबरपर्यंत सुरू असेल.
 
या काळात आम्ही ३० हजार लोकांना अस्थायी रोजगार देण्याचा विचार करीत आहोत, असे सौरभदीप qसगला यांनी सांगितले ऑगस्ट महिन्यात कर्मचाèयांची संख्या ३० हजार ५०० इतकी होती. गेल्या वर्षी सण आणि उत्सवांच्या आधी आम्ही २० हजार लोकांना काम दिले होते. हे काम जरी कामय स्वरूपाचे नसले तरी यातील एक तृतीयांश लोकांना त्यानंतर देखील कामावर ठेवण्यात आले. कारण मागणी नोंदविणाऱ्याची संख्या वाढत होती, असे सिंगला यांनी स्पष्ट केले.
 
सर्व ई-कॉमर्स कंपन्या त्यांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. वॉलमार्टची मालकी असलेल्या फ्लिपकार्टने घरपोच सेवा क्षमता वाढवण्यासाठी ५० हजारांहून अधिक किराणा दुकानदारांशी संपर्क साधला आहे. तर अ‍ॅमेझॉनने नवी पाच केंद्रे जोडली आहेत. मोठ्या शहरांसोबतच छोट्या शहरांमध्ये देखील इ-कॉम एक्स्प्रेस नियुक्ती करणार आहे.