कोरोनाबाधितांच्या अन्त्यसंस्कारासाठी वेगळी स्मशानभूमी द्या

    दिनांक :15-Sep-2020
|
- कुलधरिया यांचे प्रशासनाकडे मागणी
तभा वृत्तसेवा
वर्धा,
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा सावंगी, सेवाग्राम रुग्णालयात मृत्यू होतो. सेवाग्राम किंवा सावंगी येथील कोरोना मृतकाचा अन्त्यसंस्कार त्या त्या मोक्षधामात किंवा सोयिस्कर ठिकाणी करण्यात यावा. या दोन्ही रुग्णलयातील कोरोनाबाधितांवर अन्त्यसंस्कार वर्ध्यातील स्मशानभूमीत होत असल्याने तेथे अन्त्यसंस्काराकरिता येणार्‍या अन्य लोकांना कोरोनाचा धोका लक्षात घेता अन्त्यसंस्कार नवीन व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कमल कुलधरिया यांनी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना केली आहे.
 
 
kuldhariya_1  H
 
वर्धा येथील स्मशानभूमी सेवाग्राम येथून 7 ते 8 किलोमीटर तर सावंगी येथून 4 ते 5 किमी असून कोरोनाने मृत्यू झालेल्याचे प्रेत वर्धा मोक्षधामला आणताना शहरातील गर्दीमधून का आणण्यात येते हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. या प्रकारामुळे शहरात संसर्ग पसरण्याची शक्यता नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वर्धा मोक्षधाम येथे अन्त्यसंस्कार करण्याचे दोन ठिकाणं आहेत. यात एक नगर पालिकेचे सर्वांसाठी खुले तर दुसरे राजस्थानी समाजाचे समाजासाठीचे. या दोन्ही ठिकाणी अन्त्यसंस्कार केले जातात.
 
 
 
वर्धा शहरालगत 2 किमी परिसरातील रहिवासी आपल्या नातेवायीकांचा अन्त्यसंस्कार येथील स्मशान भुमीत करतात. त्यामुळे येथे दररोज 5 ते 6 जणांवर अन्त्यसंस्कार केले जातात. कोरोना मृतकाच्या अन्त्यसंस्काराचे नियम सुरक्षेच्या दृष्टीने तयार केले आहेत. ज्यावेळी कोरोना बाधिताच्या मृत्यूचे प्रमाण कमी होते त्यावेळी नियमांचे पालन होत होते. परंतु, कोरोनाचा प्रार्दुभाव जिल्ह्यात वाढला. सोबत मृत्यूची संख्या वाढली. परंतु, त्याचा अन्त्यसंस्कार सर्वसामान्य मृतकाप्रमाणे होत असल्याने तेथूनची प्रादूर्भाव होण्याची शक्यता असल्याचेही कुलधरिया यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानी मोक्षधामला मोठे दोन द्वार आहेत. राजस्थानी मोक्षधाम उंचावर आहेत. त्याच्या पहिल्या द्वारावर दोन ओटे आहेत दुसर्‍या द्वारावर दोन ओटे आणि 10 जणांंचा अन्त्यसंस्कार होऊ शकतो ऐवढी रिकामी जागा आहे. त्या द्वारावर तात्पुरती कोरोना स्मशान भुमी घोषित केल्यास सुरक्षेच्या दृष्टीने योग्य होईल किंवा पुर्ण राजस्थानी मोक्षधामच कोरोनाचा उद्रेक असेपर्यंत राखीव ठेवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.