373 नवे बाधित; पाच मृत्यू

    दिनांक :16-Sep-2020
|
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 373 नवीन बाधितांची भर पडली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांची एकूण सं‘या 6 हजार 682 झाली आहे. आतापर्यंत 3 हजार 690 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. तर सध्या 2 हजार 903 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
 
 
corona_1  H x W
 
मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपुरातील बंगाली कॅम्प येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय त्यांचा मृत्यू झाला आहे. दुसरा मृत्यू ब‘ारपुरातील महाराणा प्रताप वार्ड येथील 46 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला. कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता. तिसरा मृत्यू चंद्रपूर येथील क‘ाइस्ट रूग्णालय परिसर येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला. कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता. . चवथा मृत्यू टीचर कॉलनी परिसर, चिमूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताला कोरोनासह न्युमोनिया, उच्च रक्तदाब, मधुमेह आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. तर, पाचवा मृत्यू नवीन एसटी वर्कशॉप परिसर, तुकुम चंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरुष बाधितालाही कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला.
 
 
 
जिल्ह्यात आतापर्यंत 89 बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी जिल्ह्यातील 82, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन,यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 239, कोरपना तालुक्यातील 18, गोंडपिपरी तालुक्यातील 5, चिमूर तालुक्यातील 23, जिवती तालुक्यातील 1, नागभीड तालुक्यातील 2, पोंभुर्णा तालुक्यातील 1, ब‘ारपूर तालुक्यातील 23, ब‘ह्मपुरी तालुक्यातील 4, भद्रावती तालुक्यातील 14, मूल तालुक्यातील 8, राजुरा तालुक्यातील 10, वरोरा तालुक्यातील 12, सिंदेवाही तालुक्यातील 1, सावली तालुक्यातील 10, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.