३८५ रुग्ण औषधोपचारातून बरे तर २८५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

    दिनांक :16-Sep-2020
|
- एका बाधित रुग्णाचा मृत्यू
गोंदिया,
कोरोना विषाणुचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहे. आज एकीकडे नवे २८५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असतांना तब्बल ३८५ कोरोना बाधित रुग्ण औषधोपचारातून बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ४ रुग्ण हे बाहेर जिल्हा किंवा राज्यातील आहे. ६५ वर्षीय रुग्ण राहणार तिरोडा यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हयात आतापर्यंत प्रयोगशाळा चाचणीतून २५८० नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून १३८६ नमुने असे एकूण ३९६६ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.
 
 
corona_1  H x W
 
आज जे २८५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १७९ रुग्ण आढळले आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील आंबाटोली-३, बाजपाई वार्ड-२, फुलचूर-४, गोविंदपूर-४, बरबरपुरा-१, विवेकानंद कॉलनी-१, सिंधी कॉलनी-४, गौशाला वार्ड-१३, छोटा गोंदिया-४, टी.बी.टोली-७, रेलटोली-२, रिंग रोड-१, गजानन कॉलनी-५, मुर्री-१, रामनगर-१, साई कॉलनी-१, कुंभारेनगर-७, दत्तनगर-३, शास्त्री वार्ड-४, गौरीनगर-३, पंचायत समिती कॉलनी-१, देशबंधू वार्ड-१, रविशंकर वार्ड-१, गुरुनानक वार्ड-१, माताटोली-१, पांढराबोडी-८, मारवाडी शाळेजवळ-१, शंकरनगर-२, रामनगर-३, श्रीनगर-४, बसंतनगर-७, यादव चौक-६, राजेंद्र वार्ड-१, आशिर्वाद कॉलनी-१, कटंगी-९, गोंदिया-८, मरारटोली-२, बाजपेई चौक-१, अंगुर बगीचा-१, काकोडी-१,तिलक वार्ड-१, डव्वा-१, पाल चौक-१, बाबु लाईन-१, सिव्हील लाईन-१७, चंद्रशेखर वार्ड-१, सावरी-१, चिचटोली-१, भिमनगर-२, प्रताप वार्ड-१, मामा चौक-१, लक्ष्मीनगर-१, खमारी-१, कारंजा-२, सुर्याटोला-१, रावणवाडी-१, धामनेवाडा-१, परसवाडा-१, रजेगाव-८, सहयोग-३ व राधाकृष्ण वार्ड येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
 
 
 
तिरोडा तालुक्यातील शहिद मिश्रा वार्ड-६, तिरोडा-१, बोपेसार-१, सुकडी-१, संत कंवरराम वार्ड-१, शंकरनगर-१, चुरडी-१, सिंधी कॉलनी-१, गांधी वार्ड-३, वडेगाव-१, अशोक वार्ड-२, झाकीर हुसेन वार्ड-२, किला वार्ड-४ व बेरडीपाल येथील एक रुग्ण. गोरेगाव तालुक्यातील चिपा-१, कुऱ्हाडी-३, चिचगाव टोला-२, पाथरी-२ व गोरेगाव शहरातील पाच रुग्ण. आमगाव तालुक्यातील गोंडीटोला-१, पदमपूर-३, पाऊलदौना-२, कालिमाटी-१, आमगाव-११, बनगाव-३, बोरकन्हार-१ व बिरसी येथील एक रुग्ण.
सालेकसा तालुक्यातील सातगाव-१, बिजेपार-१, साखरीटोला-१ व कुणबीटोला येथील दोन रुग्ण. देवरी तालुक्यातील बारेगाव-५, देवरी-४ व देवरी शहरातील वार्ड नं.१५ येथे एक रुग्ण व वार्ड नं.८ मधील ८ रुग्ण. सडक/अर्जुनी येथील एक रुग्ण. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील ताळेगाव-१, आसोली-१, गोठणगाव-६, तिलखेडा-१, बंदगाव-२, चिचटोली-१, नवेगावबांध-१ व अर्जुनी/मोरगाव येथील तीन रुग्ण. तर इतर जिल्हा/राज्यातील ब्रम्हपुरी-१, तुमसर-१ व बालाघाट येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.
 
 
 
जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-२२४६, तिरोडा तालुका-५७३, गोरेगाव तालुका-१३९, आमगाव तालुका- २६२, सालेकसा तालुका-१०५, देवरी तालुका-१६७, सडक/अर्जुनी तालुका-११२, अर्जुनी/मोरगाव तालुका-१६२ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-७४ रुग्ण आहे. असे एकूण ३८४० रुग्ण बाधित आढळले आहे.
 
 
 
आज ३८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-३२७,तिरोडा तालुका-२०, गोरेगाव तालुका-१२, आमगाव तालुका-५, सालेकसा तालुका-३, देवरी तालुका-१०, सडक/अर्जुनी-५ व अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे.
 
 
जिल्हयात आतापर्यंत २२६६ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-१३८६, तिरोडा तालुका- ३४२, गोरेगाव तालुका-६४, आमगाव तालुका-१४१, सालेकसा तालुका-६०, देवरी तालुका-७७, सडक/अर्जुनी तालुका-७९, अर्जुनी/मोरगाव तालुका-१०९ आणि इतर-८ रुग्णांचा समावेश आहे.
 
 
कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या आता १५१८ झाली आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका-८३१, तिरोडा तालुका-२१९, गोरेगाव तालुका-७४, आमगाव तालुका-११६, सालेकसा तालुका-४४, देवरी तालुका-९०, सडक/अर्जुनी तालुका-३०, अर्जुनी/मोरगाव तालुका-५२ आणि इतर-६२ असे एकूण १५१८ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. त्यापैकी १५१८ क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.
 
 
 
कोरोना क्रियाशील रुग्णांपैकी ७६६ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-५४५, तिरोडा तालुका-३७, गोरेगाव तालुका-३७, आमगाव तालुका-४१, सालेकसा तालुका-६, देवरी तालुका-५७, सडक/अर्जुनी तालुका-२८, अर्जुनी/मोरगाव तालुका-१५ व इतर ०० असे एकूण ७६६ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.
 
 
 
जिल्हयात आतापर्यंत ५६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-२९, तिरोडा तालुका-१२, गोरेगाव तालुका-१, आमगांव तालुका-५, सालेकसा तालुका-१, सडक/अर्जुनी तालुका-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-१ व इतर ठिकाणच्या चार रुग्णांचा समावेश आहे.
 
 
 
विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण २४०१४ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये १९३८८ नमुने निगेटिव्ह आले. तर २५८० नमुने पॉझिटिव्ह आले आहे. १२७४ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून ७७२ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात २१ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ४७१ व्यक्ती अशा एकूण ४९२ व्यक्ती विलगिकरणात आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत १८४४२ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये १७०५६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. १३८६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
 
 
 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी १६१ चमू आणि १४० सुपरवायझर १४० कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-५, आमगाव तालुका-२२, सालेकसा तालुका-११, देवरी तालुका-२७, सडक/अर्जुनी तालुका-२०, गोरेगाव तालुका-१९, तिरोडा तालुका-३४ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-२ असे एकूण १४० कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.
 
 
 
रुग्णांच्या सुविधेसाठी सर्व रुग्णांना त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांचा कोविड-१९ चा अहवाल एस.एम.एस.द्वारे कळविण्यात येत आहे. सदरहू अहवाल ग्राह्य धरण्यात यावा.असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके यांनी केले आहे.