एकाच दिवशी 82 मि मी पाऊस

    दिनांक :16-Sep-2020
|
- राहेरी ते शेवली रस्त्यावरील चार पुल वाहुन गेले
- वाहतुक ठप्प
साखरखेर्डा,
सिंदखेडराजा तालुक्यातील सोनोषी मंडळात 15 ला पुन्हा आभाळ फाटल्यागत मुसळधार पाऊस पडल्याने राहेरी बु ते शेवली रस्त्यावरील चार पुल वाहून गेले आहेत . त्यामूळे वाहातूक बंद झाली आहे . 13 सप्टेंबर रोजी सोनोषी मंडळात 75 मिमी पाऊस पडल्याने अनेक छोटे बंधारे फुटल्याने त्या बंधार्‍यांची वाट लागली . याच दिवशी विद्रुपा धरण भरल्याने सांठव्यातून मोठा प्रवाह वाहत असतांना चांगेफळ येथील तिघांना जलसमाधी मिळाली होती.
 
 
bulpur_1  H x W
 
एकच दिवस लोटत नाही तोच पुन्हा 15 ला सोनोषी मंडळातच 82 मि मी पाऊस पडल्याने राहेरी बु ते शेवली या 25 कि मी रोडवरील चार पुल वाहून गेले आहेत . हा रस्ता खामगाव ते वाटूर फाटा राज्य महामार्ग म्हणून प्रशासनाने माण्यता दिली असून जवळपास रोडचे कामही पुर्ण झाले आहे . या रोडवरील एकाही पुलाची उंची वाढविण्यात आली नसून बहुतेक पुल हे सिमेंट पोग्यावरच आहेत . 15 ला राहेरी बु ., जांभोरा , सोनोषी , वर्दडी , रुम्हणा , चांगेफळ , आडगाव राजा , सोयंदेव , बुट्टातांडा , धानोरा या भागात आभाळ फाटल्यागत मुसळधार पाऊस पडल्याने अनेक तकलादू पुलाची वाट लागली आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी या पुलाची दखल घेऊन पुलाखालून पाणी कसे वाहील या प्रमाणे उंची वाढवून मजबूत पुलाचे काम करावे अशी मागणी या भागातील नागरिकांची केली आहे.
 
 
 
रुम्हणा गावाशेजारुन जाणार्‍या नदीला 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी पुर आल्याने संपुर्ण वाहतूक ठप्प झाली होती . रुम्हणा येथील शेतकरी शेतात गेलेले होते . पाऊस धोधो कोसळत असल्याने शेतकरी , शेतमजूर शेतातच अडकले . परंतू पाऊस कमी होत नसल्याने आणि गावाजवळील नदीला पूर आला तर घरी जाता येणार नाही . या लगबगीने पावसातच भिजत घरचा रस्ता धरला . गावाजवळ येतात तर नदीने रौद्र रूप धारण करून पाणी मारोतीच्या मंदीराला लागले होते . रात्र झाली होती . पुर वाढतच होता . अशातच माजी आमदार तोताराम कायंदे , शिवराज कायंदे यांनी तुकाराम कायंदे विद्यालयाच्या सर्व खोल्या खुल्या करुन ग्रामस्थांना आश्रय दिला.
 
 
 
नदिच्या अलीकडील शेतकर्‍यांनी शिवराज कायंदे यांच्या मदतीने सर्वांची भोजनाची व्यवस्था केली . 15 ला सिंदखेडराजा मंडळात 21 मिमी , किनगावराजा मंडळात 37 मिमी , सोनोषी मंडळात 82 मिमी , दुसरबीड मंडळात 05 मिमी , मलकापूर पांग्रा 02 मिमी , शेंदुर्जन मंडळात 20 मिमी , तर साखरखेर्डा मंडळात 13 मिमी पाऊस पडला आहे . तालुक्यात 25 मिमी पाऊस पडला असून आज पर्यंत सिंदखेडराजा तालुक्यात 757 :07 मि मी पावसाची नोंद झाली आहे . मराठवाडा आणि विदर्भातील सिमेवर धानोरा या गावालगत विद्रुपा नदीवरील थरण भरले असून दोन्ही सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहे . त्याच बरोबर मांडवा , केशव शिवणी , या मोठ्या प्रकल्पासह लहान मोठे सर्वच तलाव भरले आहेत .