केंद्र सरकारने घेतलेली कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी- रयत क्रांती संघटना

    दिनांक :16-Sep-2020
|
मेहकर,
केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी केली आहे त्यामुळे कांद्याचे भाव कमालीचे घसरले आहे. शेतकरी साठी ही बंदी मागे घेण्याची मागणी रयत क्रांती च्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत जिल्हाधिकार्‍यांच्या नावे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद की, यापूर्वी लॉकडाऊन च्या काळामध्ये शेतकर्‍यांचा फळे भाजीपाला बाजार भाव न मिळाल्यामुळे फेकून द्यावा लागला. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे परंतु सध्या कांदाचाळी मध्ये साठवलेला कांदा शेतकर्‍यांनी विक्रीसाठी काढलेला आहे कारण यापुढे सदर चाळीतील कांदा खराब होऊन जाणार आहे.
 
 
hub_1  H x W: 0
 
सध्या कांदा कांद्याला चांगले बाजार भाव मिळत होती परंतु केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भाव पडले आहे कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा शेतकर्‍यांवर अन्याय करणारा आहे. शासनाकडून शेतकरी विरोधी धोरणे मात्र राबवली जात आहे त्याचाच एक भाग म्हणजे कांदा निर्यात बंदी ा आहे. हा शेतकर्यांच्या आत्महत्या वाढवणारा निर्णय आहे त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा 17 पासून रयत क्रांती संघटना व कांदा उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करतील याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची असेल. निवेदन देताना रयत क्रांती संघटनेचे प्रदेश प्रवक्ते ऍड. जितू अडेलकर, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब गवई , अनिल सरदार श्याम लठाड, विशाल चव्हाण सतीश बोरकर, ज्ञानेश्वर पवार, रजनीकांत कांबळे, शिवाजी ढवळे आदी उपस्थित होते.