टाळेबंदीच्या काळात मेट्रोची चार स्थानके तयार

    दिनांक :16-Sep-2020
|
-एलएडी चौक स्थानक सुसज्ज
नागपूर 
अँक्वा लाईनवरील एलएडी चौक मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेकरिता सुसज्ज झाले असून, लवकरच नागरिकांना या स्टेशनवरून मेट्रोने प्रवास करता येणार आहे. एलएडी चौक अँक्वा लाईन मार्गीकेवरील तयार झालेले ८ व्या क्रमांकाचे मेट्रो स्थानक आहे. सीताबर्डी इंटरचेन्ज ते लोकमान्य नगर दरम्यान असलेल्या या मार्गावर एकूण ११ स्टेशन प्रस्तावित आहेत. या स्थानकांची नावे या प्रमाणे आहेत - लोकमान्य नगर, बंसी नगर, वासुदेव नगर, रचना रिंग रोड, सुभाष नगर, अंबाझरी लेक व्ह्यू, एलएडी स्क्वेअर, शंकर नगर, इस्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झांसी राणी स्क्वेअर आणि सीताबर्डी इंटरचेंज.

mund_1  H x W:  
महा मेट्रोची प्रवासी सेवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मेट्रो सेवा बंद असली तरीही महा मेट्रो प्रशासनाने निर्माण कार्याची गती कायम ठेवत ऑरेंज आणि अँक्वा लाईन मार्गिकवरील एकूण ०४ मेट्रो स्टेशन प्रवासी सेवे करिता सज्ज केले आहेत तसेच इत्तर मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु आहे. .
प्रवासी सेवा करिता सज्ज झालेल्या मेट्रो स्टेशन मध्ये ऑरेंज मार्गिकेवरील रहाटे कॉलोनी आणि अजनी चौक, तर अँक्वा लाईनवरील बंसी नगर आणि एलएडी चौक मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. अँक्वा लाईन मार्गिकवरील ११ स्थानकांपैकी लोकमान्य नगर, वासुदेव नगर, सुभाष नगर, इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झांसी राणी स्क्वेअर आणि सिताबर्डी असे एकूण ६ मेट्रो स्टेशनवरून प्रवासी वाहतूक या आधीच सुरु झाली आहे.
 
स्टेशन लगतच्या परिसरात अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालय, हॉस्पिटल, तसेच रहिवासी परिसर असल्यामुळे या परिसरात प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते. शहरातील इतर भागातून येणाèया विद्याथ्र्यांना या स्थानकाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
 
एलएडी चौक मेट्रो स्टेशनवर आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्याकरिता बेसमेंट मध्ये अग्निशामक टँक, स्टेशन च्या छतावर सौर पॅनेलची व्यवस्था, सौर पॅनेल निर्मित वीज थेट ग्रीडमध्ये येणार, यामुळे कमी होणार ऑपरेशन खर्च, ग्रीन बिल्डिंगच्या नियमांनुसार बायो डायजेस्टरने सुसज्ज, स्टेशनच्या दोन्ही बाजूने पायèया, एस्केलेटर व्यवस्था यामुळे ग्राउंड ़फ्लोअर ते कॉनकोर्स आणि कॉनकोर्स ते प्लॅटफॉर्मवर दरम्यान चढणे qकवा उतरणे सहज शक्य, दिव्यांग व्यक्तींसाठी लिफ्टची सुविधा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची व्यवस्था, संपूर्ण स्टेशन सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत राहणार आहे.