शहराच्या स्वच्छतेसाठी नगरसेवकांचे बेमुदत उपोषणाला सुरवात

    दिनांक :16-Sep-2020
|
तभा वृत्तसेवा
घाटंजी, 
शहरात सर्वत्र अस्वच्छता व घाणीचे साम‘ाज्य असताना वारंवार तक‘ारी देऊनही जिल्हाधिकार्‍यांनी या संदर्भात कुठलीच उपाययोजना व कारवाई न केल्यामुळे शहराच्या स्वच्छतेकरिता व नागरिकांच्या आरोग्यासाठी नगरसेवकांनी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला होता.

corn_1  H x W:  
जिल्हाधिकारी यांनी कुठली दखल न घेतल्यामुळे अखेर नगरसेवकांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग निवडला आहे. नगरसेवकांनी वारंवार तक‘ार करूनही प्रशासन त्यांची दखल घेत नसेल व त्यांना शहराच्या स्वच्छतेसाठी उपोषणाला बसावे लागत असेल तर शहरातील सामान्य नागरिकांना खरच नगर परिषद घाटंजी येथे न्याय मिळत असेल का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
नप घाटंजीमधील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सुरू असलेल्या कंत्राटामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने शहरात सर्वत्र अस्वच्छता व घाणीचे साम‘ाज्य निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. शहरातील कोरोना रुग्णांच्या सं‘येत वाढ होत असताना प्रशासन स्वच्छतेसाठी योग्य ती उपाययोजना करण्यासाठी तत्परता दाखवीत नसल्याचे व संबंधितांवर कारवाई करण्यास तयार नसल्याचे यावरून दिसते. न्याय मिळाल्या शिवाय उपोषण सोडणार नसल्याचे नगरसेवकांनी सांगितले आहे..
 
या उपोषणाला सर्व राजकीय पक्षातर्फे पाठिंबा दिला गेला आहे. तसेच यासंदर्भात निवेदनही सर्व राजकीय पक्षांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केले आहे. आता तरी प्रशासन याची दखल घेणार की नाही याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.