वानरांनी हिसकला कावळ्यांचा घास!

    दिनांक :16-Sep-2020
|
- भक्तांची होते ३ किलोमीटरची पायपीट
- अनिल फेकरीकर
नागपूर, 
निसर्गातील जैवविविधता टिकलीच पाहिजे. परंतु रामटेक या ऐतिहासिक स्थळावर एका प्राण्याने महत्त्वपूर्ण अशा पक्ष्याच्या तोंडचाच घास हिसकल्याने तो चक्क गावाबाहेर फेकल्या गेला आहे. हो, ही खरी गोष्ट असून, रामटेक येथे लाल रंगाच्या वानरांनी स्वत:च्या स्वार्थापोटी कावळ्यांच्या तोंडचाच घास हिसकल्याने अंबाळ्यातून हा पक्षीच नामशेष झाला आहे.
  
co_1  H x W: 0
रामटेकचे अंबाळा हे श्राद्धविधीसाठी संपूर्ण देशात प्रख्यात आहे. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनीही काही काळ वास्तव्य केले होते. याच पवित्र अशा ठिकाणी दररोज श्राद्ध विधी केला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत येथील कावळ्यांची संख्याही भरपूर होती. कालांतराने भ्रमणध्वनी आले, अंबाळ्यात टॉवर लागले. आता त्यातून निघणाèया किरणोत्सर्गामुळे म्हणा qकवा इतर कारणांनी कावळ्यांवर संकट ओढवले. त्यांचे प्रमाण घटतच गेले. दरम्यान, त्याही परिस्थितीत श्राद्ध विधीचा नैवेद्य खायला मिळतो म्हणून त्या अवस्थेतही काही कावळे तग धरून होते.
 
पण काही वर्षांपूर्वी अंबाळ्यात लाल वानरांनी प्रवेश केला. रामटेक हा भाग काळ्या वानरांसाठी प्रसिद्ध होता. पण अचानक लाल वानरांनी अंबाळ्याचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी आपली संख्या फुगवली. आता याच अंदाजे ५०० ते ७०० वानरांच्या टोळ्या श्राद्ध विधी सुरू असताना झाडावर टपून बसतात. एखाद्या भक्ताने तर्पण करून कावळ्यांना नैवेद्य दाखविला की, त्यावर ही लालतोंडी वानरसेना तुटून पडते. यामुळे कावळ्यांवर उपासमार आली आहे. याच उपासमारीला कंटाळून आता कावळ्यांनी अंबाळा सोडून रामटेक शहरातील राष्ट्रीय आदर्श विद्यालयाच्या परिसरातील वडाच्या आणि qपपळाच्या वृक्षावर नवीन राज्य स्थापन केले आहे. याच ठिकाणी भक्तांना जाऊन कावळ्यांना नैवेद्य दाखवावा लागतो. तेव्हा कुठे त्यांच्या मृत आप्तस्वकीयांच्या आत्म्यास शांती मिळते.
 
कावळा हा रंगाने काळा असतो. कावळा माणसाच्या वसाहतीजवळ राहतो, पण तो घरात कधीच येत नाही. qहदू संस्कृतीत माणसाच्या मृत्यूपश्चात तेराव्या दिवशी व प्रत्येक श्राद्धाच्या वेळेस कावळ्याला केळीच्या पानात जेवण देण्याची प्रथा आहे. तसेच रोजच्या अन्नातील एक घास कावळ्यासाठी काढून ठेवण्याची प्रथा आहे. यास काकबली असेही म्हणतात. पिंपळ, वड यासारख्या झाडांची फळे कावळे खातात. त्यांच्या विष्ठेतून बिया बाहेर पडतात आणि त्या रुजतात. qपपळ आणि वड ही दोन्ही झाडे मानवासाठी प्राणवायू देणारे संकटमोचक आहेत. या दोन्ही झाडांचे अप्रत्यक्षात रोपण करणारा कावळा जगायला हवा. तो जगावा याकरिता त्याला उत्तम असे अन्न मिळायला हवे. हाही आपल्या पूर्वजांचा दृष्टिकोन असावा, म्हणूनच आता रामटेक येथील अंबाळा भागात पुन्हा एकदा कावळ्यांचे आगमन झालेच पाहिजे, अशीच प्रार्थना सर्वपित्री अमावस्येला सर्वांनी करायला हवी.
विधी अंबाळ्यात नैवेद्य रामटेकात : मनीष मुलमुले
qहदू धर्मात माणूस मरण पावल्यानंतर त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ अत्यंत श्रद्धेने केल्या जाणाèया विधीला श्राद्ध असे म्हटले जाते. त्यानुसार तीर्थ श्राद्ध, पक्ष श्राद्ध, पंचदश मासिक श्राद्ध, भरणी श्राद्ध, ब्रह्मार्पण श्राद्ध, हिरण्य श्राद्ध, आम श्राद्ध, तर्पण श्राद्ध, महालय श्राद्धादी प्रकार केले जातात. यात सर्वच ठिकाणी कावळ्याला घास दिला जातो. पूर्वी अंबाळा रामटेक तीर्थक्षेत्र भागात कावळ्यांची संख्या भरपूर होती. कावकाव म्हणताच शेकडो कावळे गोळा व्हायचे. आता आम्ही अंबाळ्यात श्राद्ध विधी करतो अन् कावळ्यांसाठी नैवेद्य दूर रामटेकात दाखवतो, अशी व्यथा पुरोहित मनीष श्यामराव मुलमुले यांनी तरुण भारतजवळ मांडली. यावर उपाय म्हणून पुन्हा कावळ्यांचे आगमन आमच्या अंबाळ्यात व्हावे याकरिता पक्षीप्रेमींनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.