स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर आधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

    दिनांक :16-Sep-2020
|
-नागो गाणार यांचे प्रतिपादन
-माय एनईपी स्पर्धेचे थाटात उद्घाटन
नागपूर, 
गेल्या ७३ वर्षांपासून चालत आलेली शैक्षणिक धोरणे ही लॉर्ड मेकॉलेच्या धोरणांमध्ये सुधारणा करून काळाच्या गरजेनुसार लागू करण्यात आली होती. नवीन आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे आपण मेकॉलेच्या चष्म्यातून बघू नये. जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देणाèया स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर व महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास आपण अवश्य करावा असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक आमदार नागो गाणार यांनी माय एनईपी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

JB_1  H x W: 0
या देशाला स्वतःचे शैक्षणिक धोरणच नाही असे मत मेकॉलेने सरकारवर थोपले होते. नवीन धोरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून बघू नये तर आपल्या देशात जन्माला आलेला कुणाही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हे धोरण आहे. मातृभाषेतून शिक्षणाची गरज आहे यासाठी समाजाची मानसिकता बदलवण्यास प्रबोधन करणे गरजेचे आहे असेही ते याप्रसंगी म्हणाले.
स्पर्धेचे उद्घाटक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी परीक्षांच्या व्यस्ततेमुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. याप्रसंगी त्यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
स्वातंत्र्यानंतर अनेक प्रकारे शिक्षण व्यवस्थेमध्ये चांगले बदल घडवून आणण्याचे प्रयत्न झाले. परंतू राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०चे वैशिष्ट्य असे की गावपातळीपासून मसुदा समिती पर्यंत अनेक बैठकी मधून याची चर्चा होऊन धोरण आखले गेले आहे. या धोरणानुसार ढांचागत परिवर्तन होणार असून ५+३+३+४ पद्धत लागू होणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, दिव्यांग, मूकबधिर या सर्वांच्या दृष्टीने उपयुक्त धोरण आहे. ठढए कायद्यानुसार वय वर्षे ३ ते १८ मधील गरीब विद्याथ्र्यांना लाभ होणार आहे. कौशल्य विकास, संस्कृत सह पाली, प्राकृत इ. भारतीय भाषांचा अभ्यास तसेच विदेशी भाषांचाही अभ्यास, उच्च शिक्षणात संशोधन आदींवर भर देण्यात आला आहे.
 
हे धोरण लवचिक असून विद्याथ्र्यांना इच्छेनुसार हवे ते शिकता येणार आहे. उच्च शिक्षणामध्ये ही एकाच वेळी अनेक विषय शिकण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. सर्वांना समान संधी मिळणार आहे. भविष्यात स्वयंरोजगार यांना अधिक चालना मिळणार असून भारताचा आर्थिक विकास निश्चित होईल आणि भारत जगात प्रथम स्थानी जाईल असे कार्यक्रमात प्रमुख उपस्थित विद्या भारती विदर्भ व देवगिरी प्रांताचे संघटन मंत्री शैलेश जोशी म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत भांगे यांनी केले तर संपूर्ण स्पर्धेची माहिती संयोजक रोशन आगरकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह योगेश बन यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहकार्यवाह अतुल मोघे, विद्या भारतीचे क्षेत्र कार्यकारणी सदस्य श्रीकांत देशपांडे, मंत्री सतीश खोत, विद्यापीठ शिक्षण मंचाचे संजय दुधे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे आशीष भाकरे तसेच भारतीय शिक्षण मंडळ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कृत भारतीचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.