आज जिल्ह्यात 138 कोरोना बाधीत , तीन जणांचा मृत्यू

    दिनांक :16-Sep-2020
|
- आतापर्यत 5392, 4231 सुट्टी, उपचार 1092
- आजपर्यंत 69 कोरोनाबाधीतांचा मृत्यू
बुलडाणा,
जिल्ह्यातील कोरोना अहवालानुसार 535 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 397 अहवाल कोरोना नकारात्मक असून 138 अहवाल बाधीत प्राप्त आले आहे. बाधीत अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 108 व रॅपिड टेस्टमधील 30 अहवालांचा समावेश आहे. नकारात्मक अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 229 तर रॅपिड टेस्टमधील 168 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 397 अहवाल नकारात्मक आहेत. उपचारादरम्यान समता कॉलनी, खामगांव येथील 68 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 70 वर्षीय पुरूष व शिवाजी वेस, खामगांव येथील 83 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आज 198 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
 
 
corona_1  H x W
 
आजपर्यंत 24494 रिपोर्ट नकारात्मक प्राप्त झाले आहेत. आजपर्यंत 4231 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना नकारात्मक असल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4231 आहे. आज रोजी 1497 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण नकारात्मक अहवाल 24494 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 5392 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4231 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1092 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 69 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.