आज ७० नवीन कोरोनाबाधित तर १८ कोरोनामुक्त

    दिनांक :16-Sep-2020
|
गडचिरोली,
जिल्हयात आज ७० नविन कोरोनाबाधित आढळून आले. तर सक्रिय रुग्णांपैकी १८ जण आज कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय रुग्णांची संख्या ५०६ झाली. आत्तापर्यत एकूण बाधित १७८२ रुग्णांपैकी १२६९ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
 
 
corona_1  H x W
 
आज नविन ७० बाधितांमध्ये गडचिरोलीतील ३७ जणांचा समावेश आहे. यात इंदिरानगर १, सुभाष वार्ड १, कलेक्टर कॉलनी १, जिल्हा न्यायालय १, रेड्डी गोडाऊन २, विवेकानंद नगर १, बुद्ध विहार कॉम्लेर्क्स जवळ १, हनुमान नगर १, कॅम्प भागात १, गोकुळनगर २, मेडिकल कॉलनी १, साई नगर बसेरा कॉलनी १, कॉम्लेम्क्स २, सोनापूर १, सुयोग नगर १, गीलगाव १, गणेश कॉलनी १, एचपी गॅस गोडाऊनजवळ १, कारगिल चौक १, मुरखडा ३, पोलीस संकुल २, कोटगल १, पंचवटीनगर १, वनश्री कॉलनी १, चंद्रपूरचे २ असे ३७ जण आज गडचिरोलीत बाधित झाले. वडसा येथील १९, चामोर्शी येथील वेगवेगळया वार्डात ७, आरमोरी ३, कुरखेडा २, धानोरा, भामरागड, सिरोंचा व मुलचेरा प्रत्येकी एक एक असे मिळून आज ७० नवीन कोरोना बाधित आढळून आले. आज १८ कोरोनामुक्त रुग्णांमध्ये गडचिरोली १०, चामोर्शी १ , कोरची २ , आरमोरी ५ जणांचा समावेश आहे.