उकिरड्यामुळे घरात घुसले सांडपाणी

    दिनांक :16-Sep-2020
|
वरोडी येथील नागरिकाचे बेमुदत उपोषण
तभा वृत्तसेवा
महागाव,
वरोडी ग‘ामपंचायतने बांधलेल्या सार्वजनिक नालीवर उकिरडा टाकण्याचा आततायीपणा करण्यात आला. यामुळे सांडपाणी घरात शिरले. शिवाय प्रचंड पाऊस सुरू असल्याने नालीतील साचलेले पावसाचे पाणीही घरात शिरले. हा उकिरडा काढण्याची मागणी घेऊन वरोडी येथील अन्यायग‘स्त नागरिक अशोक संभाजी जाधव यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

wah_1  H x W: 0 
 
वरोडी येथील समाधान शंकर अडकिने आणि प्रभू शंकर अडकिने यांनी ग‘ापंच्या सार्वजनिक नालीवर अतिक‘मण करून उकिरडे टाकले आहेत. इतरही काही लोकांचे आजूबाजूला उकिरडे होते. अशोक संभाजी जाधव यांचे लागूनच घर आहे. येथे संभाजी जाधव आपल्या वृद्ध व दृष्टीहिन आईसोबत राहतात.
उकिरड्यामुळे अडलले सांडपाणी साचून संभाजी जाधव यांच्या घरात जात आहे. शिवाय महिनाभरापासून सातत्याने पाऊस सुरू असून उकिरड्यामुळे अडलेले पाणी जाधव यांच्या घरात शिरल्याने या कुटुंबाला घर सोडून जाण्याची वेळ आली आहे. अशोक जाधव यांच्या विनंतीवरून इतरांनी उकिरडे काढले मात्र समाधान आणि प्रभू अडकिने यांनी हेकेखोरपणा करीत उकिरडे काढण्यास नकार दिला. त्यामुळे न्याय मिळावा म्हणून संभाजी जाधव यांनी पंचायत समिती समोर उपोषणाला सुरवात केली आहे.
पंचायत समिती प्रशासनाची हलगर्जी
अतिक‘माणात टाकलले उकीरडे आणि सांचलेले सांडपाणी घरात शिरत असल्याच्या अनेक तक‘ारी जाधव यांनी पंस प्रशासनाकडे केल्या. गेल्या काही महिन्यापासून ते पंस कार्याल्याच्या पायर्‍या झिजवित आहेत, परंतू गटविकास अधिकारी आणि ग‘ामसेवक जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रश्न चिघळला आहे. समाधान अडकिने यांच्या पत्नी माजी पंस सदस्य आहेत. राजकीय वजन वापरून समाधान अडकिने उकिरडे हटविण्यास मज्जाव करीत असल्याचा जाधव यांचा आरोप आहे.