अमरावती : 3 मृत्यू, 292 बाधित, 186 मुक्त

    दिनांक :16-Sep-2020
|
- जिल्ह्याला कोरोनाचा विळखा
तभा वृत्तसेवा
अमरावती,
जिल्ह्याला कोरोनाने घट्ट विळखा टाकला आहे. प्रत्येक भागात व गावात रुग्णांची नोंद होत आहे. बुधवारी पुन्हा 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून 292 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर 186 कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 9673 कोरोनाग्रस्त झाले आहे. त्यापैकी 2057 रुग्ण क्रियाशील असून त्यातील 10 रुग्णांना नागपूरात हलविण्यात आले तर 575 गृह विलगिकरणात आहे. आजपर्यंत 7398 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
 
 
corona_1  H x W
 
आतापर्यंत 218 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मोर्शी येथील शम्स कॉलनीतील 70 वर्षीय पुरूष, अचलपूर येथील 65 वर्षीय महिला, त्याचप्रमाणे अमरावती समर्थ कॉलनीतील 65 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अमरावती शहरातील वडाळी, कॅम्प, खोलापुरी गेट, मच्छीसाथ, शिदोर प्लॉट, साई नगर, सुरज नगर, सुशील नगर, मांजरे नगर, नवाथे नगर, काँग्रेस नगर, गोपाल नगर, गुलेश्वर, शांती नगर, दरोगा प्लॉट, सरोदे हॉस्पिटल, जेवड नगर, कॅम्प, परभनी कॉलनी, विद्यापीठ कॉलनी, गजानन टाऊनशिप, रहाटगाव, महालक्ष्मी अपार्टमेंट पोटे कॉलेज जवळ, उत्कर्ष नगर,अमर नगर, रामपुरी कॅम्प, जुना कॉटन, रवीनगर, श्रीराम नगर, मसानगंज, फ्रेजरपूरा, जुना आदिवासी नगर, महेंद्र कॉलनी, राधानगर, विलास नगर, नवाथे नगर, मोती नगर, गाडगे नगर, चपराशीपूरा, कलेक्टर कॉलनी, गांधी नगर, चिचफैल, बडनेरा, जलाराम नगर, यशोदा नगर, प्रभा कॉलनी, किरण नगर, जलपूर्ती कॉलनीसह अन्य भागातील व ग्रामीण परिसरातील चांदुर रेल्वे, तिवसा, अंजनगाव सुर्जी, भातकुली, वरुड, वलगाव, अंजनगाव सुर्जी, वेणी गणेशपूर, शिरपूर, शिवणी, नांदगाव खंडेश्वर, पळस मंडल, धामणगाव रेल्वे, परतवाडा, सिंदी, सिंभोरा रोड, मोर्शी, उमरी इतबार, नालवाडा, दर्यापूर, मालखेड, आमला विश्वेश्वर, कळमगाव, चांदूर रेल्वेसह अन्य ठिकाणचे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. या नवीन 292 बधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे थ्रोट स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 
 
आयटीआयमध्ये कोविड रुग्णालय
सुपर स्पेशालिटी रुग्णालयातल्या कोविड सेंटर पासून काही अंतरावर असलेल्या आयटीआयमध्ये 100 खाटांचे शासकीय कोविड केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तेथील व्यवस्थेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच हे कोविड सेंटर सुरू होईल, अशी माहिती मिळाली आहे. सुपर स्पेशालिटी व आयटीआयला जोडण्यासाठी एक नवीन रस्ताही तयार करण्यात येत आहे.
 
 
 
नागरिकांना आवाहन
‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेला जिल्ह्यात सुरुवात झाली असून नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणा-या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण थांबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. आरोग्य पथकाला सहकार्य करावे. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांसह संपूर्ण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.