कांदा वर लादलेल्या निर्यात बंदीचा निर्णय तातडीने रद्द करा

    दिनांक :16-Sep-2020
|
- शेतकरी संघटनेची मागणी
तभा वृत्तसेवा
वर्धा,
5 जून 2020 अध्यादेशा व्दारे शेती पिकांना जीवनावश्यक वस्तू यादीतून वगळण्यात आल्याचे जाहीर करून, सदर विधेयकांची अमंलबजावणी देशात सुरू केली , या निर्णयाचे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी स्वागत केले. आणी धन्यवाद सुध्दा दिले. पण, आज कांदा चे भाव थोडे वाढल्या बरोबर आपल्या सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेवून आपली शेतकरी विरोधी भूमिका कायम आहे, हे दाखवून दिले. कांदा वर लादलेल्या निर्यात बंदीचा निर्णय तातडीने रद्द करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संंघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या मार्फत पंतप्रधात नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनातून केला आहे.
 

kanda_1  H x W: 
 
निवेदनात नमुद केल्यानुसार, कांदा भाववाढीचे कारण - सततचे पावसाळी वातावरण, व त्यामुळे शेतातील कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, बाजारात कांदाची आवक कमी प्रमाणात होत असल्याने थोडे भाव जास्त झाले, या भाववाढीने शेतकर्‍यांचे झालेले नुकसान भरपाई होण्यास मदत होईल, असे दिसत असताना, आपल्या सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय जाहीर केल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, परिणामी शेतकरी कर्ज बाजारी होवून आत्महत्येस प्रवृत होईल. करिता कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा कोवीड 19 च्या या वातावरणात शेतकर्‍यांना रस्तावर उतरावे लागेल. याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
 
 
 
यावेळी उल्हास कोटमकर, सतीश दाणी, हेमंत वखारे, गणेश मुटे, मुकेश धाडवे, गजानन निकम, महादेव गोह, खुशाल हिवरकर, ज्योती निकम, प्रमोद तलमले, शांताराम भालेराव, अरविंद बोरकर, भाऊराव देवडे, कमलाकर भोयर, जीवन बाबूलकार आदींची उपस्थिती होती.