पिंप्री सरहद ते मालेगाव रस्ता खड्डेमय

    दिनांक :16-Sep-2020
|
- अपघाताची शृंखला सुरूच
शिरपूर जैन,
औरंगाबाद-नागपूर राज्यमहामार्गावर पडलेल्या खड्यामुळे पिंप्री सरहद्द ते मालेगाव या रोडची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर खड्याचे साम्राज्य झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. मागील आठवड्यात नंधाना येथील दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाला. लागोपाठ झालेल्या अपघातामुळे तप्त लोकांनी रास्तारोको केला होता.
 
 
khadde_1  H x W
 
पिंप्री सरहद ते मालेगाव रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार होत असतांना देखील त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. संबंधित अधिकारी यांच्या हलगर्जीपणा मुळे हा महामार्ग मृत्युचा सापळा बनलेला आहे. संबंधित प्रशासन अजूनही झोपेतच आहे का? असा प्रश्‍न नागरिकांना पडलेला आहे. तरी याबाबत संबंधित अधिकारी यांना धारेवर धरुन या रस्त्याचे संपूर्ण काम 7 दिवसाचे आत चालू करावे.अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल, अशी मागणी केनवड येथील विष्णु बाजड, शुभम केशव शेवाळे, वैभव तुळशीराम बोरकर , सतीश भारत गोळे यांनी मुख्यमंत्री यांचेकडे जिल्हाधिकारी वाशीम यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.